फॅटी लिव्हरमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो का? वाचा एक्सपर्ट काय सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 10:52 AM2023-08-23T10:52:53+5:302023-08-23T10:55:14+5:30

Fatty liver : लिव्हर ट्रांसप्लांटेशनचे डॉक्टर रवि यांनी सांगितलं की, लिव्हरची समस्या जास्त करून हृदयावर प्रभाव टाकते. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

Can fatty liver cause problems like heart attack know what experts say about that | फॅटी लिव्हरमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो का? वाचा एक्सपर्ट काय सांगतात...

फॅटी लिव्हरमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो का? वाचा एक्सपर्ट काय सांगतात...

googlenewsNext

Fatty liver : लिव्हरमध्ये जेव्हा जास्त प्रमाणात फॅट जमा होतं तेव्हा फॅटी लिव्हर नावाच्या आजाराचा सामना करावा लागतो. फॅटी लिव्हर ही काही मोठी समस्या नाही, पण याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. फॅटी लिव्हर दोन प्रकारचे असतात अल्कोहोलिक फॅटी लिव्हर जे जास्त मद्यसेवन केल्याने होतं आणि दुसरं म्हणजे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर ही समस्या चुकीच्या आहारमुळे होते.

एक्सपर्टनुसार, जर फॅटी लिव्हरची समस्या वाढते तेव्हा त्यामुळे लिव्हर कॅन्सरही होऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीचं लिव्हर योग्यपणे काम करत नसेल तर शरीरातील फॅट आणि कोलेस्ट्रॉलमुळे शरीरार बॅड कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. ज्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो.

लिव्हर ट्रांसप्लांटेशनचे डॉक्टर रवि यांनी सांगितलं की, लिव्हरची समस्या जास्त करून हृदयावर प्रभाव टाकते. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. लिव्हर फॅट उर्जेत बदलण्यास आणि आवश्यक प्रोटीनचं निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावतं. जे हृदयासाठी महत्वाचं आहे.

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर किंवा क्रोनिक फॅटी लिव्हरसारख्या स्थितींमुळे लिव्हर खराब होतं. याने लिपिड मेटाबलिज्म रोखलं जातं ज्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्राइग्लिसराइड्सचं प्रमाण वाढतं. लिपिड मेटाबॉलिज्मचं संतुलन बिघडलं तर एथेरोस्क्लेरोसिस वाढतं. ज्यामुळे धमण्या ब्लॉक होतात. याच कारणाने हार्ट अटॅक येतो.

फॅटी लिव्हरमध्ये या गोष्टींची घ्या काळजी

1) वजन नियंत्रित ठेवा

लठ्ठपणामुळे फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते. जर तुम्हाला फॅटी लिव्हरमुळे होणाऱ्या समस्या किंवा धोका कमी करायचा असेल तर वजन कमी करा. वजन कमी करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करा. जंक फूड खाणं बंद करा आणि हेल्दी डाएट फॉलो करा.

2) मद्यसेवन कमी करा

जास्त प्रमाणात मद्यसेवन केलं तर फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते. जर तुम्हाला ही समस्या असेल तर मद्यसेवन टाळलं पाहिजे किंवा कमी करा.

3) आरोग्य बॅलन्स करा

जर तुम्हाला डायबिटीस, हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय बीपीसारखी समस्या असेल तर या समस्या बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. 

4) हेल्दी डाएट घ्या

आपल्या आहारातून रिफाइंड स्वीट आणि शुगरला कमी करा. डाएटमध्ये हेल्दी गोष्टी जशा की,  फळं, भाज्या, कडधान्य, लीन प्रोटीन आणि हेल्दी फॅटचा समावेश करा.

Web Title: Can fatty liver cause problems like heart attack know what experts say about that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.