ओमायक्रॉन संसर्गामुळे मिळु शकते कोरोनापासून आयुष्यभराची सुरक्षितता? बघा संशोधन काय सांगते

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 07:19 PM2022-01-12T19:19:02+5:302022-01-12T19:22:18+5:30

ओमायक्रॉन व्हेरिएंटसंदर्भात एक संशोधन केलं आहे. या संशोधनामध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग होऊन त्यामधून पूर्णपणे ठणठणीत झालेल्या रुग्णांना पुन्हा डेल्टा व्हेरिएंट किंवा इतर प्रकारच्या संसर्गाचा धोका नसतो असं म्हटलंय. ओमायक्रॉनचा संसर्ग होऊन गेलेले रुग्ण हे इतर संसर्गाचा सामना करण्यासाठी सक्षम असतात असं अभ्यात नमूद करण्यात आलंय.

Can an omecron infection give people lifelong safety? See what the research says | ओमायक्रॉन संसर्गामुळे मिळु शकते कोरोनापासून आयुष्यभराची सुरक्षितता? बघा संशोधन काय सांगते

ओमायक्रॉन संसर्गामुळे मिळु शकते कोरोनापासून आयुष्यभराची सुरक्षितता? बघा संशोधन काय सांगते

Next

दक्षिण आफ्रिकेमधील वैज्ञानिकांनी करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटसंदर्भात एक संशोधन केलं आहे. या संशोधनामध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग होऊन त्यामधून पूर्णपणे ठणठणीत झालेल्या रुग्णांना पुन्हा डेल्टा व्हेरिएंट किंवा इतर प्रकारच्या संसर्गाचा धोका नसतो असं म्हटलंय. ओमायक्रॉनचा संसर्ग होऊन गेलेले रुग्ण हे इतर संसर्गाचा सामना करण्यासाठी सक्षम असतात असं अभ्यात नमूद करण्यात आलंय. वैज्ञानिकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होऊ शकते. मात्र दिर्घकालीन विचार केल्यास ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयामध्ये भरती होण्याची गरज पडणार नाही अशी दाट शक्यता आहे. 

डर्बन येथील आफ्रिका हेल्थ रिसर्च इन्स्टीट्यूटमध्ये व्हायरोलॉजिस्ट म्हणून काम करणाऱ्या अॅलेक्स सिगल यांनी दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटची जागा घेतोय. डेल्टा व्हेरिएंटचा प्रभाव यामुळे कमी होतोय ही दिर्घकालीन विचार केल्यास चांगली बाब असू शकते असं सिगल यांचं म्हणणं आहे. सिगल पुढे म्हणतात, “आमच्या संशोधनामधून असं दिसून आलं आहे की ओमायक्रॉन व्हेरिएंटसोबत आपण तुलनात्मकरित्या अधिक सहजपण राहू शकतो. हा व्हेरिएंट करोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा फार कमी नुकसान करणारा आहे,” असं सांगितलं.

लंडन स्कूल ऑफ हायजीन अॅण्ड ट्रॉपिकल मेडिसिनमधील एक साथरोग तज्ज्ञ असणाऱ्या कार्ल पियर्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अहवाल प्राथमिक असला तरी ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव हा फार वेगाने होतो हे खरंय. डेल्टा व्हेरिएंटचा प्रभाव आता कमी होऊ लगाल्याचंही कार्ल यांनी सांगितलं. येल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील साथरोग तज्ज्ञ असणाऱ्या नॅथन ग्रुबॉघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, करोना संसर्गाच्या कनेक्टीव्हीटीचा एक पॅटर्न समोर आलाय. या पॅटर्ननुसार ओमायक्रॉन वेगाने वाढतोय त्याच वेगाने डेल्टाचा प्रादुर्भाव कमी होतोय, असं नॅथन यांनी म्हटलंय.

वैज्ञानिकांनी ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गावर मात केलेल्यांसंदर्भातील अभ्यासाचा लेखाजोखा या अहवालात मांडलाय. या अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे ओमायक्रॉनचा संसर्ग होऊन गेलेल्यांमध्ये उच्च प्रतिच्या आणि जास्त सक्षम अ‍ॅण्टीबॉडीज आहेत. या अ‍ॅण्टीबॉडीज अगदी धोकादायक वाटणाऱ्या विषाणूच्या संसर्गाविरोधातही सक्षम आणि परिणामकारक आहेत. त्यामुळेच ओमायक्रॉनचा संसर्ग आणि त्यामुळे निर्माण झालेल्या या अ‍ॅण्टीबॉडीज या घातक संसर्गाचा कायमचा नायनाट करण्यासाठी कारणीभूत ठरु शकतो, असं म्हटलं जात आहे.

मात्र त्याचवेळी वैज्ञानिकांनी असंही म्हटलंय की लसीकरण न झालेल्या लोकांवर ओमायक्रॉनचा काय परिणाम होतो हे पाहणं आवश्यक आहे. ओमायक्रॉनमुळे डेल्टाचा प्रभाव कमी होऊन कालांतराने तो नष्टही होईल पण याचा अर्थ ओमायक्रॉन हा अनेक पिढ्यांसाठी सर्वात शक्तीशाली विषाणू राहील असं म्हणता येणार नसल्याचंही तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय.

Web Title: Can an omecron infection give people lifelong safety? See what the research says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.