धमन्यांमध्ये वाढलेलं कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी इफेक्टिव्ह ठरेल कांदा, 'असा' करा वापर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 04:13 PM2020-05-21T16:13:57+5:302020-05-21T16:15:01+5:30

शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून कांद्याचा वापर कसा करायचा याबाबत माहिती असायला हवी.

Can onions help control cholesterol levels myb | धमन्यांमध्ये वाढलेलं कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी इफेक्टिव्ह ठरेल कांदा, 'असा' करा वापर 

धमन्यांमध्ये वाढलेलं कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी इफेक्टिव्ह ठरेल कांदा, 'असा' करा वापर 

Next

शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढण्याची अनेक कारणं आहेत. अनिमित जीवनशैली, आहारात झालेला बदल यांमुळे अनेकदा कॉलेस्ट्रॉल वाढतं. त्यापाठोपाठ हृदयासंबंधी समस्या सुद्धा उद्भवतात. हार्ट स्टोक, हार्ट अटॅकची समस्या वाढत जाते.  घरगुती पदार्थांचा वापर करून तुम्ही आपलं कॉलेस्ट्रॉल चांगलं ठेवू शकता.  परिणामी हृदयाच्या आजारांचा धोका टळू शकतो. कांद्याचा वापर  स्वयंपाकघरात नेहमीच केला  जातो. कांदा हा शरीरासाठी लाभदायक ठरतो. शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून कांद्याचा वापर कसा करायचा याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हेल्दी कॉलेस्ट्रॉल 

रिसर्चनुसार कांद्यात अनेक पोषक घटक असतात त्यामुळे कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवली जाऊ शकते. फ्लेवोनोईड्स आणि  एंटी इंफ्लेमेंट्री गुण असल्यामुळे कांदयाच्या सेवनाने आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. कांद्यात फायटोकेमिकल असते. त्यामुळे शरीरात व्हिटॉमिन सी चे प्रमाण वाढते.

त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. अनेक रोगांपासून दूर राहण्यासाठी कांदा फायदेशीर ठरतो. मधुमेहांच्या रुग्णांसाठी सुद्धा कांद्याचे सेवन करायला हवे.  कांद्यात असे गुण असतात त्यात ग्लासेमीक  इंडेक्स कमी असतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात कांद्याचा समावेश करायला हवा.

जाणून घ्या फायदे

आहारात कांद्याचा समावेश केल्यास पचनक्रिया व्यवस्थित राहते.

कांद्या मध्ये फास्फोरिक एसिड असते जे आपल्या रक्तास शुध्द करण्याचे कार्य करते. 

कांद्यात अनेक एंटी बॅक्टेरिअल गुण असतात जे व्हायरसशी लढण्यासाठी फायदेशीर ठरतात.

कांद्याच्या गरम रसाने पायांच्या तळव्यांना मालिश करावी यामुळे पायांना आराम मिळतो.

तुम्ही सॅलेड मध्ये किंवा तोंडी लावण्यासाठी कांद्याचे सेवन करू शकता.  ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित  करण्यात आलेल्या शोधानुसार कांद्यात फ्लेवोनॉईड्स कमी घनत्व असणारे वाले लिपोप्रोटीन (एलडीएल),  लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांमधील कॉलेस्ट्रॉल कमी करू शकतात.  फूड एंड फंक्शन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार हृदयाच्या आजारांना स्वतःपासून लांब ठेवायचं असेल तर कांदयाचे सेवन करायला हवे.  जर तुम्हाला कांद्याच्या सेवनाने कोणतीही एलर्जी किंवा रिएक्शन होत असेल तर सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

धोका वाढला! हवेतूनही १८ फुटांपर्यंत होऊ शकतो कोरोनाचा प्रसार,'या' लोकांना बसेल जास्त फटका...

Coronavirus : नव्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा, केवळ 10 मिनिटात तुम्ही होऊ शकता कोरोना व्हायरसचे शिकार!

Web Title: Can onions help control cholesterol levels myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.