रेकीमुळे खरंच वजन कमी करता येतं का? जाणून घ्या याचे फायदे....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 11:04 AM2019-09-27T11:04:59+5:302019-09-27T11:11:53+5:30

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपायांबाबत तुम्ही नेहमीच ऐकत आणि वाचत असाल. अशातच वजन कमी करण्याचा एक जपानी उपाय चर्चेत आला असून याने खरंच वजन कमी करण्यास मदत होते का?

Can Reiki help with weight loss? Know the facts of this therapy | रेकीमुळे खरंच वजन कमी करता येतं का? जाणून घ्या याचे फायदे....

रेकीमुळे खरंच वजन कमी करता येतं का? जाणून घ्या याचे फायदे....

googlenewsNext

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपायांबाबत तुम्ही नेहमीच ऐकत आणि वाचत असाल. अशातच वजन कमी करण्याचा एक जपानी उपाय चर्चेत आला असून याने खरंच वजन कमी करण्यास मदत होते का? असा प्रश्न विचारला जात आहे. रेकी ही एक जपानी नैसर्गिक चिकित्सा आहे. यात विधीमध्ये जीवन शक्ती आणि प्राण शक्तीच्या माध्यमातून उपचार केले जातात. म्हणजे व्यक्तीमध्ये एक आत्मविश्वास आणि सकारात्मकता निर्माण करण्याची ही पद्धत असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उपचाराने एक नाही तर वेगवेगळे आजार बरे केले जातात असा दावा केला जातो. 

(Image Credit : medicalnewstoday.com)

या उपचार पद्धतीत व्यक्तीमधील शक्तीचाच त्याच्या समस्येच्या उपचारासाठी वापर केला जातो. रेकी उपचारात तळहातांना आणि बोटांना स्पर्श करून चिकित्सा केली जाते. रेकी उपचाराने वजन कमी करणे, हृदयरोग, कॅन्सर, झोप न येणे, थकवा, डोकेदुखी, त्वचा रोग, डिप्रेशन या समस्या दूर केल्यात जात असल्याचं बोललं जातं.

वजन कमी करण्यात कसा फायदेशीर ठरतो हा उपचार

रेकी अशी चिकित्सा पद्धती आहे, ज्याने मानसिक आणि शारीरिक रूपाने शरीर निरोगी होतं. रेकी टेक्निकद्वारे शरीरात ऊर्जा निर्माण केली जाते आणि ही ऊर्जाच शरीरातून आजार दूर करण्यासाठी काम करते. याने मेंदू तणावमुक्त होऊन भावनांना मजबूत करतो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात आणि वजन कमी करण्यासाठीच नाही तर कीमोथेरपीचे साइड इफेक्ट दूर करण्यासाठीही ही पद्धत फायदेशीर ठरते. वजन वाढल्याने नकारात्मकता आणि तणावही वाढतो. तणाव वाढला की, गोड किंवा फास्ड फूड खाण्याची इच्छा अधिक होते. पण रेकी या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते.

कसा केला जातो उपचार?

संतुलन - जेव्हा लोक रेकी उपचारातून जातात तेव्हा ते नेहमीच शारीरिक आणि भावनात्मक रूपाने अधिक संतुलित राहतात. याने वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याने त्यांना वजन कमी करण्यास मदत मिळते.

(Image Credit : vermontvisitingnurses.org)

तणाव होतो कमी - रेकीच्या प्राथमिक उपायोगांपैकी एक म्हणजे याने तणाव कमी केला जातो. तणावाचं प्रमाण अधिक असलं की, शरीरात एड्रेनालाइन, कोर्टिसोल आणि कॉर्टिखोट्रॉफिन हार्मोन रिलीज होऊ लागतात. जे रेकीमुळे नष्ट होतात. तणावामुळे वजन वाढतं. यामुळे अनेकांना वजन कमी करण्यात अडचणी येतात. पण रेकीमुळे ही समस्या दूर होते. 

झोपेची पद्धत सुधारते - ज्या लोकांनी चांगली झोप येत नाही, त्यांच्यासाठी रेकी उपचार फार फायदेशीर ठरतो. वजन वाढण्याचं एक मोठं कारण चांगली झोप न येणं आणि पुरेशी झोप न होणं. रेकीमुळे तणाव कमी होतो आणि शरीर रिलॅक्स होतं. याने लोकांना चांगली झोप येते. तसेच याने हार्मोनल संतुलनासोबत भूकही नियंत्रित राहते.

Web Title: Can Reiki help with weight loss? Know the facts of this therapy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.