व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्यू?; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं ठरेल जीवघेणं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 12:30 PM2024-07-22T12:30:46+5:302024-07-22T12:31:19+5:30

Vitamin B 12 : व्हिटॅमिन B12 शरीरासाठी इतकं आवश्यक आहे की त्याच्या कमतरतेमुळे शरीर योग्यरित्या कार्य करू शकत नाही. अशा परिस्थितीत दीर्घकाळ उपचार न केल्यास व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता असते.

can vitamin b12 deficiency cause death symptoms of cobalamin deficiency | व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्यू?; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं ठरेल जीवघेणं

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्यू?; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं ठरेल जीवघेणं

व्हिटॅमिन बी 12 हे आपल्या शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व आहे. रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये, मज्जासंस्थेचं काम आणि डीएनए संश्लेषणामध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन बी 12 चं योग्य प्रमाण असणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.

कमतरतेकडे दुर्लक्ष केल्याने हे तुमच्या जीवावर देखील बेतू शकतं. व्हिटॅमिन B12 शरीरासाठी इतकं आवश्यक आहे की त्याच्या कमतरतेमुळे शरीर योग्यरित्या कार्य करू शकत नाही. अशा परिस्थितीत दीर्घकाळ उपचार न केल्यास व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता असते.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे मज्जासंस्थेचं मोठं नुकसान होऊ शकते. यामुळे हात आणि पायांना मुंग्या येणे, सुन्नपणा आणि अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. गंभीर प्रकरणांमध्ये, हाडांवर देखील परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे चालण्यासाठी अडचण येते.

क्लीवलँड क्लिनिकच्या मते, व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे रक्तपेशींचे उत्पादन कमी झाल्यामुळे कायमचं न्यूरोलॉजिकल नुकसान होऊ शकतं ज्यामुळे उपचार न केल्यास मृत्यू होऊ शकतो. थकवा, अशक्तपणा आणि श्वास घेण्यात अडचण यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

मानसिक आरोग्यावर परिणाम

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे नैराश्य आणि स्मृतिभ्रंश यासारख्या मानसिक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. याशिवाय, यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होण्याचा धोका वाढतो आणि मेंदू योग्यरित्या कार्य करत नाही.

हृदयविकाराचा धोका

हृदयविकार हे आज मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. काही अभ्यासांमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता हृदयविकाराच्या वाढीव जोखमीशी देखील जोडली गेली आहे.

'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष 

जर तुम्हाला थकवा, अशक्तपणा, हात-पायांमध्ये मुंग्या येणे किंवा उदासीनता यांसारखी लक्षणे दीर्घकाळ जाणवत असतील, तर तुमच्या व्हिटॅमिन बी12 ची चाचणी करा. या समस्या लवकर ओळखल्यास आणि उपचार केल्यास टाळता येऊ शकतात.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करण्याचा उपाय

व्हिटॅमिन बी 12 नैसर्गिकरित्या मांस, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळते. शाकाहारी लोकांसाठी, व्हिटॅमिन बी 12 असलेले फोर्टिफाइड फूड्स किंवा व्हिटॅमिन बी 12 सप्लिमेंट खाणं फायदेशीर ठरू शकतं. आरोग्यविषयक काही समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 
 

Web Title: can vitamin b12 deficiency cause death symptoms of cobalamin deficiency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.