कसा दिसतो कोरोनाचा B.1.1.7 व्हेरिएंट, जो भारतात आहे संक्रमणाचं मुख्य कारण? पहिला फोटो जारी....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 01:32 PM2021-05-04T13:32:33+5:302021-05-04T13:34:21+5:30
Coronavirus : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने गेल्यावर्षी मध्य डिसेंबरमध्ये B.1.1.7 व्हेरिएंटची पहिली केस नोंदवली होती. यामुळेच मोठ्या संख्येने म्युटेशन बघायला मिळालं.
कॅनडातील वैज्ञानिकांनी कोविड-१९ व्हायरसच्या (Coronavirus) B.1.1.7 व्हेरिएंटचा पहिला फोटो जारी केला आहे. याद्वारे हे समजू शकेल की, हा व्हायरस आधीच्या व्हायरसच्या व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक संक्रामक का आहे. B.1.1.7 व्हेरिएंटमुळे केवळ ब्रिटनमध्येच कोरोनाच्या केसेस वाढल्या नाही तर भारत आणि कॅनडामध्येही कोरोनाने थैमान घातलं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने गेल्यावर्षी मध्य डिसेंबरमध्ये B.1.1.7 व्हेरिएंटची पहिली केस नोंदवली होती. यामुळेच मोठ्या संख्येने म्युटेशन बघायला मिळालं.
यूनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाने सांगितले की, हा फोटो एटॉमिक-रिझोल्यूशनवर काढण्यात आलाय. याने माहिती मिळेल की, B.1.1.7 व्हेरिएंट इतका संक्रामक का आहे. सर्वातआधी ब्रिटनमध्ये B.1.1.7 व्हेरिएंट आढळून आला होता. सध्या कॅनडातही कोरोना केसेस वाढण्याला हे व्हेरिएंट कारणीभूत आहे. वैज्ञानिकांच्या टीमचं नेतृत्व करणारे डॉ. श्रीराम सुब्रमण्यम यांनी केलं. ते यूनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियात मेडिसिन डिपार्टमेंट आणि बायोकेमिस्ट्री अॅन्ड मॉलिक्यूलर बायोलॉजीचे प्रोफेसर आहेत.
डॉ. श्रीराम सुब्रमण्यम यांना कोरोना व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनमध्ये सापडणाऱ्या N501Y नावाच्या एका म्यूटेशनमध्ये खासकरून इंटरेस्ट होता. कोरोना व्हायरसच्या माध्यमातून मानवी शरीरात असलेल्या कोशिकांशी तो जुळतो आणि त्यांना संक्रमित करतो. ते म्हणाले की, आमच्याकडून घेण्यात आलेल्या फोटोत N501Y म्यूटेंटची पहिली स्ट्रक्चरल झलक दिसते. यातून हे समजतं की, यात होणार बदल हा स्थानिय स्तरावर होतो.
डॉ. सुब्रमण्यम म्हणाले की मुळात N501Y म्यूटेशन B.1.1.7 व्हेरिएंटमध्ये असलेला एकुलता एक असं म्युटेशन आहे जे स्पाइक प्रोटीनमध्ये आहे. हेच मानवी शरीरात असलेल्या ACE2 रिसेप्टरसोबत जुळतं. ACE2 रिसेप्टर आपल्या शरीरातील कोशिकांच्या पृ्ष्ठभागावरील एक एंजाइम आहे. जे Sars-CoV-2 व्हायरससाठी प्रवेशद्वारासारखं काम करतं.
खास मायक्रोस्कोपने घेतला फोटो
कोरोना व्हायरस पिनेच्या टोकापेक्षा एक लाख पटीने अधिक छोटा आहे आणि सामान्य मायक्रोस्कोपच्या माध्यमातून याला ओळखणं किंवा बघणं शक्य नाही. व्हायरस आणि प्रोटीनच्या योग्य आकाराची माहिती मिळवण्यासाठी रिसर्च टीमने क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर केला. यातून हा व्हायरस V आकाराचा दिसला.