Cancer in children: प्रौढांमध्येच नाही लहान मुलांमध्येही आढळतो कॅन्सर, पालकांनी 'अशी' घ्यावी काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 05:26 PM2022-03-11T17:26:01+5:302022-03-11T17:29:07+5:30

आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की, कॅन्सर (Cancer) हा असाच एक जीवघेणा आजार आहे, ज्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. कर्करोगाची प्रकरणे केवळ प्रौढांमध्येच नाही तर लहान मुलांमध्येही आढळतात.

cancer in children symptoms remedies and causes | Cancer in children: प्रौढांमध्येच नाही लहान मुलांमध्येही आढळतो कॅन्सर, पालकांनी 'अशी' घ्यावी काळजी

Cancer in children: प्रौढांमध्येच नाही लहान मुलांमध्येही आढळतो कॅन्सर, पालकांनी 'अशी' घ्यावी काळजी

googlenewsNext

पालकांना मुलांच्या आजारांची खूप काळजी असते, पण अनेकदा होतं असं की, आजार काहीतरी असतो आणि पालक दुसऱ्याच काही उपचारावर खर्च करत राहतात. नंतर जेव्हा खऱ्या रोगाचे निदान तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की, कॅन्सर (Cancer) हा असाच एक जीवघेणा आजार आहे, ज्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. कर्करोगाची प्रकरणे केवळ प्रौढांमध्येच नाही तर लहान मुलांमध्येही आढळतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लहान मुलांमध्ये कर्करोगाचे अनेक प्रकार आढळतात. परंतु सर्वात सामान्य म्हणजे रक्ताचा कर्करोग. सुमारे ५० ते ६० टक्के रुग्ण हे ब्लड कॅन्सरचे असतात आणि योग्य वेळी उपचार घेतल्यास बरे होण्याची शक्यता सर्वाधिक असते. दैनिक भास्कर वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले वृत्तही याच दिशेने बोट दाखवणारे आहे. या अहवालानुसार, भारतात कर्करोगाच्या सर्व प्रकरणांपैकी ५ टक्के प्रकरणे लहान मुलांची आहेत. पालकांनी मुलांमधील कॅन्सरची लक्षणे ओळखून वेळीच उपचार घेतल्यास ते वाचू शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे (Cancer cases in children are not genetic) आहे.

राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरच्या पेडियाट्रिक हेमॅटोलॉजी आणि ऑन्कोलॉजीच्या संचालक डॉ. गौरी कपूर न्युज १८ हिंदीला सांगतात, की, लहान मुले आणि प्रौढांमधील कर्करोग भिन्न आहेत. कर्करोगाचा प्रकार आणि उपचारांना दिलेला प्रतिसाद आणि बरा होण्याच्या दरानुसार हे बदलतात. ल्युकेमिया, मेंदू आणि पाठीच्या कण्यातील गाठी, न्यूरोब्लास्टोमा, विल्म्स ट्यूमर, लिम्फोमा आणि रोटिनोब्लास्टोमाची प्रकरणे मुलांमध्ये आढळतात.

लहान मुलांमध्ये कॅन्सरचा फैलाव खूप वेगाने होतो, पण जर तो योग्य वेळी ओळखला गेला आणि योग्य उपचार दिले गेले तर केमोथेरपी चांगले परिणाम देते. ते म्हणाले की, लहान मुलांमध्ये ब्लड कॅन्सर असाध्य आहे असा गैरसमज आहे. तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया हा लहान मुलांमधील सर्वात सामान्य रक्ताचा कर्करोग आहे आणि सर्व प्रकरणांपैकी ८० टक्के रुग्ण आधुनिक उपचार पद्धतींनी बरे होऊ शकतात.

कर्करोगाची ९० टक्के प्रकरणे अनुवांशिक नसतात. डॉ गौरी कपूर यांनी न्युज १८ हिंदीला दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांमध्ये कर्करोगाबाबत एक गैरसमजही आहे की हे कर्करोग अनुवांशिक आहेत, तर हे खरे आहे की कर्करोग डीएनएमधील बदलांमुळे होतो. तथापि, मुलांमधील कर्करोगाच्या ९० टक्क्यांहून अधिक प्रकरणे अनुवांशिक नसतात आणि म्हणूनच हे कर्करोग एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जात नाहीत.

मुले बरी होऊ शकतात
राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरचे डॉ. पंकज गोयल न्युज १८ हिंदीला म्हणतात की, लहान मुलांमध्ये कॅन्सर झाल्यास रिकव्हरी चांगली होऊ शकते. मुलांमध्ये कॅन्सर होण्यामागे जीन्सही खूप महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं ते सांगतात. पालकांच्या जनुकांमध्ये काही गडबड असेल, तर मुलांनाही त्याचा धोका असतो. मात्र, अनेकदा असे घडते की, पालकांना कर्करोग होत नाही, तर मुलांना होतो.

Web Title: cancer in children symptoms remedies and causes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.