चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 11:51 AM2024-06-15T11:51:35+5:302024-06-15T12:02:29+5:30
भारतात ब्रेस्ट कॅन्सर, प्रोटेस्ट कॅन्सर यासारख्या कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. त्यात असंही आढळून आले की, केवळ ३० वर्षांत, जागतिक स्तरावर ५० वर्षांखालील लोकांमध्ये कॅन्सरच्या नवीन प्रकरणांमध्ये ७९ टक्के वाढ झाली आहे.
कॅन्सर हा आजार केवळ वृद्ध लोकांनाच होतो असं आधी मानलं जात होतं. परंतु आता तरुणांमध्येही कॅन्सरची अनेक प्रकरणं दिसून येत आहेत. अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलं आहे की भारतातील तरुणांमध्ये कॅन्सरचं प्रमाण हळूहळू वाढत आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये २०२३ साली प्रकाशित झालेल्या एका रिसर्चमध्ये असं सांगण्यात आलं होतं की, भारतात ब्रेस्ट कॅन्सर, प्रोटेस्ट कॅन्सर यासारख्या कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. त्यात असंही आढळून आले की, केवळ ३० वर्षांत, जागतिक स्तरावर ५० वर्षांखालील लोकांमध्ये कॅन्सरच्या नवीन प्रकरणांमध्ये ७९ टक्के वाढ झाली आहे.
तरुणांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढण्याचं कारण काय?
लाईफस्टाइल - कॅन्सरच्या वाढत्या घटनांमागे एक प्रमुख कारण म्हणजे आपली आधुनिक लाईफस्टाईल. लठ्ठपणा ही भारतातील तरुणांमध्ये वाढणारी समस्या आहे आणि १५ प्रकारच्या कॅन्सरचं कारण आहे. धुम्रपान आणि अति मद्यपानामुळेही कॅन्सर होतो.
अनुवांशिक कारण - कुटुंबातील एखाद्याला कॅन्सर झाला असला तरी तरुणपणात कॅन्सरचा धोका असतो. ५-१०% तरुणांमध्ये कॅन्सर होण्याचे कारण अनुवांशिक आहे.
अन्नामध्ये पौष्टिकतेचा अभाव - आजकाल बहुतेक तरुण प्रक्रिया केलेले अन्न खातात ज्यामध्ये पोषक तत्वांचा अभाव असतो. शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
तरुणांमध्ये कॅन्सरचं वाढतं चिंताजनक
तरुणांमध्ये कॅन्सरचं वाढतं प्रमाण हे अनेक कारणांमुळे चिंतेचं कारण बनत आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये असं घडतं की कॅन्सरची पारंपारिक लक्षणं तरुणांमध्ये दिसून येत नाहीत ज्यामुळे कॅन्सर झालाय हे लवकर समजत नाही.
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना अपोलो हॉस्पिटलच्या डॉ पाखी अग्रवाल म्हणतात की, तरुणांध्ये कॅन्सर अधिक आक्रमक असतो आणि त्याचा पॅटर्न समजत नाही, ज्यामुळे त्याच्यावर उपचार करणं अधिक आव्हानात्मक असतं.
प्रक्रिया केलेले अन्न आणि रेड मीट जास्त प्रमाणात खाल्ल्याने कोलोन कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे फळं, भाज्या आणि प्रथिने पुरेशा प्रमाणात असलेले अन्न खा. जर आपण शारीरिक हालचाली कमी केल्या तर दोन्ही गोष्टी मिळून कॅन्सरचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा आणि नियमित व्यायाम करा. धुम्रपान आणि मद्यपान टाळा.