Cancer : 'या' लोकांना कॅन्सरचा जास्त असतो धोका, नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 07:22 PM2022-03-04T19:22:07+5:302022-03-04T19:23:07+5:30
Cancer : रिसर्चमधून सांगण्यात आलं की, इंग्लंडमध्ये २०१३ पासून २०१७ दरम्यान समोर आलेल्या कॅन्सर केसेच्या आधारावर हा रिसर्च करण्यात आला आणि निष्कर्ष जारी करण्यात आले.
(Image Credit : nytimes.com)
कॅन्सर (Cancer) एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. हा आजार झाला आणि वेळेत निदान झालं तर जीव वाचू शकतो. पण आजाराचं निदान उशीरा झालं तर जीवाला धोका होऊ शकतो. या आजाराबाबत करण्यात आलेल्या एका ताज्या रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. कॅन्सरवर रिसर्च करणारी संस्था कॅन्सर रिसर्च यूकेने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं की, गोरे नसलेल्या आणि आशियाई लोकांना कॅन्सर होण्याचा धोका कमी आहे. गोऱ्या लोकांना कॅन्सरचा धोका जास्त आहे.
रिसर्चमधून सांगण्यात आलं की, इंग्लंडमध्ये २०१३ पासून २०१७ दरम्यान समोर आलेल्या कॅन्सर केसेच्या आधारावर हा रिसर्च करण्यात आला आणि निष्कर्ष जारी करण्यात आले. या रिसर्चमधून समोर आलं की, गोऱ्या लोकांच्या तुलनेत कॅन्सरचा धोका आशियाई लोकांमध्ये ३८ टक्के आणि सावळ्या लोकांमध्ये ४ टक्के कमी असतो. तसेच मिश्रित लोकांमध्ये हा धोका ४० टक्के कमी असतो.
यूकेमध्ये वाढतोय कॅन्सरचा धोका
BBC मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, गोऱ्या लोकांच्या तुलनेत सावळ्या आणि आशियाई लोकांमध्ये कॅन्सरबाबत असमानता आहेत. रिसर्चर कॅटरीना ब्राउन म्हणाल्या की, अशा लोकांमध्ये कॅन्सरचा धोका वेगवेगळ्या कारणांनी होतो. जसे की, व्यक्तीचं वय आणि त्याला पॅरेंट्सकडून मिळालेले जीन्स. त्या म्हणाल्या की, UK मध्ये कॅन्सरच्या ४० टक्के केसेस लाइफस्टाईलमध्ये बदल आणून रोखल्या जाऊ शकतात.
ब्रिटिश जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, यूकेमध्ये कॅन्सरच्या केसेस वाढत आहेत. यावर आणखी रिसर्च करण्याची गरज आहे. रिसर्चच्या माध्यमातून हे समजून घेतलं जाऊ शकतं की, कशाप्रकारे वेगवेगळ्या समूहांच्या लोकांमध्ये कॅन्सर विकसित होतो.
नशेपासून दूर राहण्याचा सल्ला
वैज्ञानिकांनी या गोष्टीवर जास्त जोर दिला की, कॅन्सर रोखण्यासाठी स्मोकिंगपासून दूर रहा, वजन कंट्रोलमध्ये ठेवा आणि वेळीच टेस्ट करा. असं करून कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ करतो.
गोऱ्यांना कॅन्सरचा धोका जास्त का?
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, गोऱ्या लोकांमध्ये स्कीन कॅन्सरचा धोका जास्त असतो. या लोकांमध्ये सूर्याच्या प्रखर किरणांमुळे स्कीन डॅमेज अधिक होते. पण याआधी झालेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं होतं की, गोऱ्या लोकांच्या तुलनेत सावळ्या लोकांमध्ये किंवा गोऱ्या नसलेल्या लोकांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका जास्त असतो.
रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, गोरे नसलेल्या आणि आशियाई कम्युनिटीच्या लोकांमध्ये कॅन्सरच्या केसेस जास्त नसण्याचं कारण म्हणजे स्मोकिंगची लेव्हल कमी होणे आहे. हेच कारण आहे की, गोऱ्या लोकांच्या तुलनेत गोऱ्या नसलेल्यांमध्ये बॉवेल, ब्रेस्ट आणि फुप्फुसाच्या कॅन्सरचा धोका कमी आहे.