कॅन्सरपश्चात ‘प्रेमा’अभावी वाढतो नैराश्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2016 05:10 PM2016-10-18T17:10:11+5:302016-10-18T17:31:16+5:30

कॅन्सर सर्जरी केल्यावर रुग्णांना प्रेम आणि भावनिक आधार न मिळल्याने नैराश्य येणाची शक्यता तिपटीने वाढते.

CANCER'S LOYALITY | कॅन्सरपश्चात ‘प्रेमा’अभावी वाढतो नैराश्याचा धोका

कॅन्सरपश्चात ‘प्रेमा’अभावी वाढतो नैराश्याचा धोका

Next
न्सरसारखी दुर्धर व्याधी म्हणजे व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणारी असते. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही तऱ्हेने माणसाला हतबल करणाऱ्या कॅन्सरचे अनेक दुष्परिणाम असतात. कॅन्सरवर इलाज केल्यावर रुग्णांना आप्तेष्टांच्या प्रेमाची, जिव्हाळ्याची गरज असते. नाही तर अशा रुग्णांना नैराश्याचा धोका मोठ्या प्रमाणात संभावतो, असे एका संशोधनातून दिसून आले आहे.

साऊथम्प्टन विद्यापीठ आणि मॅकमिनल कॅन्सर सपोर्ट यांनी मिळून केलेल्या एका अध्ययनानुसार, कॅन्सर सर्जरी केल्यावर रुग्णांना प्रेम आणि भावनिक आधार न मिळल्याने नैराश्य येणाची शक्यता तिपटीने वाढते.

प्रस्तुत अध्ययनामध्ये संशोधकांनी एक हजारांपेक्षा जास्त कोलोरेक्टल कॅन्सर असणाऱ्या रुग्णांचा सर्जरीपूर्वीपासून ते नंतर पाच वर्षांपर्यंत सखोल अभ्यास केला. त्याला त्यांनी ‘कोलोरेक्टल वेलबीर्इंग’ असे नाव दिले. यामध्ये असे दिसून आले की, अशा प्रकारचा कॅन्सर असणाऱ्या रुग्णांशी सर्जरीनंतर लोकांचा भावनिक संपर्क कमी होतो. त्यांना लोक योग्य तशी वागणूक देत नाही.

प्रा. क्लेअर फोस्टर सांगतात की, ‘कॅन्सरच्या रुग्णांना आपल्या जवळच्या लोकांच्या आधाराची खूप गरज असते. कर्करोगाचे निदान आणि त्यानंतरच्या उपचार कालावधीमध्ये त्यांना मानसिक सहकार्य हवे असते. सर्जरीनंतर पूर्ववत स्थितीमध्ये परतण्यासाठी आप्तेष्टांचे भावनिक सहकार्य मिळायलाच हवे. नाही तर, रुग्णांना नैराश्य येण्याचा धोका खूप वाढतो.

ज्या रुग्णांना मनमोकळेपणाने बोलायला किंवा दैनदिन कामांत मदत करण्यासाठी कोणी आसपास नसल्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारण्यात अनेक अडचणी येतात. विशेष म्हणजे, एकटे राहणाऱ्या कॅन्सर रुग्णांसाठी तर नैराश्य आणि उदासिनतेचा धोका अधिकच प्रबळ असतो. त्यामुळे संशोधक  अशा रुग्णांना इमोशनल सपोर्ट देण्याचा आवर्जुन सल्ला देतात.

Web Title: CANCER'S LOYALITY

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.