​डबाबंद अन्न आरोग्यासाठी हानिकारक!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2016 11:01 AM2016-12-25T11:01:19+5:302016-12-25T11:01:43+5:30

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात वेळेअभावी म्हणा किंवा वाढत्या ट्रेंडमुळे बहुतांश लोकं डबाबंद अन्नाकडे वळत आहेत. मात्र, आपणास माहित आहे का, या डबाबंद अन्नाचे नियमित सेवन करणे किती धोक्याचे आहे?

Canned food harmful to health! | ​डबाबंद अन्न आरोग्यासाठी हानिकारक!

​डबाबंद अन्न आरोग्यासाठी हानिकारक!

Next
च्या धकाधकीच्या आयुष्यात वेळेअभावी म्हणा किंवा वाढत्या ट्रेंडमुळे बहुतांश लोकं डबाबंद अन्नाकडे वळत आहेत. मात्र, आपणास माहित आहे का, या डबाबंद अन्नाचे नियमित सेवन करणे किती धोक्याचे आहे? यातील चायनीज पदार्थात असलेल्या अजिनामोटो नावाच्या घटकामुळे मधुमेह, रक्तदाब, अल्सर, गॅसेस, स्थुलता आदी विकार होऊ शकतात. हे अन्न जादा काळ टिकावे यासाठी अशा पदार्थामध्ये मोठया प्रमाणावर प्रिझर्व्हेटिव्ह तसेच रंगांचा वापर होतो. यात व्हिनेगार देखील असते. कृत्रिम रंग आरोग्यास किती हानी पोहोचवते हे आपणास माहितच आहे. फ्रोझन आणि डबाबंद पदार्थांचे तोटे खूपच आहेत. अन्न प्रक्रियेत हे पदार्थ अगोदर गरम पाण्यात धुतले जातात. साहजिकच त्यांच्यातील 'क' आणि 'ब' जीवनसत्वं नष्ट होतात. फळांच्या डबाबंद प्रक्रियेत त्यांच्या साली काढल्या जातात, त्यामुळे त्यांच्यातील 'फायबर'चं प्रमाण खूप कमी होतं. ते सेवन करणाºयांना साहजिकच त्यामुळे होणाºया फायद्यांना मुकावं लागतं. 
या पदार्थांमध्ये मोनो-सोडियम ग्लुटामेट, सोडियम टार्टारेट असे क्षार मिसळले जातात. त्यामुळे नैसर्गिक पदार्थांपेक्षा क्षार जास्त असतात. डबाबंद पदार्थ हे साखरेच्या पाकात टिकवले जातात; त्यामुळे त्यांच्यातील साखरेचं आणि उर्जेचे प्रमाण खूप वाढतं. साहजिकच वजनवाढ, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांना ती बाधक ठरतात. साध्या द्रवपदार्थात किंवा त्याच फळाच्या रसात भिजवलेले फळांचे काप कमी बाधक ठरतात. 
डबाबंद अन्न, प्रोसेस्ड अन्न, प्रिझर्व्हेटिव्ह घातलेलं अन्न हे सर्व खाल्ल्याने पचनाचे विकार होतात. आपल्या चुकीच्या सवयी व चुकीच्या पद्धतीचा आहार पचनाच्या तक्रारी निर्माण करतात.

Web Title: Canned food harmful to health!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.