​कानांची सफाई करताना!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2016 04:53 PM2016-12-04T16:53:49+5:302016-12-04T17:04:30+5:30

आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील अवयवांपैकी एक म्हणजे कान होय. कानाची काळजीबरोबरच सफाईदेखील आवश्यक आहे. मात्र सफाई करताना चुकीच्या पद्धतीने केल्यास कानाला दुखापत होऊ शकते.

Cannes cleaning! | ​कानांची सफाई करताना!

​कानांची सफाई करताना!

Next
ल्या शरीरातील सर्वात संवेदनशील अवयवांपैकी एक म्हणजे कान होय. कानाची काळजीबरोबरच सफाईदेखील आवश्यक आहे. मात्र सफाई करताना चुकीच्या पद्धतीने केल्यास कानाला दुखापत होऊ शकते. बरेचजण कानाची सफाई ही काडीला कापूस गुंडाळून किंवा हेअर पीनने करतात, मात्र असे करणे योग्य नाही. कानांना साफ करण्याचा योग्य मार्ग कोणता हे जाणून घ्या.

इयर कॅडलिंग-
कानातील मळ काढण्यासाठी सध्या बऱ्याच सलून आणि ब्यूटी पार्लरमध्ये इयर कॅडलिंग केले जाते. विशेष म्हणजे इयर कॅडलिंगचा वापर प्राचीन काळापासून केला जात आहे. यात पोकळ मोणबत्तीच्या सहाय्याने कानातील मळ काढला जातो. यामध्ये मेणबत्तीचे एक टोक कानामध्ये ठेवले जाते तर दुसऱ्या टोकाला पेटविले जाते. यातून निर्माण होणाऱ्या गरमीमुळे कानातील मळ वितळून बाहेर पडतो. मात्र ही प्रक्रिया हानिकारकही सिद्ध होऊ शकते. कारण यात मेणबत्तीच्या एका टोकाला कानाच्या वर पेटवले जाते. त्यामुळे कानाला किंवा शरीराच्या इतर अवयवांना इजा पोहोचू शकते. त्यामुळे तुम्हाला या पद्धतीने काम साफ करायचे असल्यास एक्सपर्टकडून ही प्रक्रिया करून घेणे आवश्यक आहे.

योग्य मार्ग -
कानातील मळ काढण्यासाठी अंघोळ करताना कोमट पाण्याने कानाच्या वरील भाग साफ करून घ्या. त्यामुळे कानातील मळ मऊ होऊन वरती आल्यावर तुम्ही सहजासहजी कान साफ करू शकता.

Web Title: Cannes cleaning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.