वजन कमी करण्यासाठी आता कॅप्सूल, पण....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 10:33 AM2019-05-11T10:33:56+5:302019-05-11T10:41:57+5:30
अनेकजण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते डाएटपासून ते एक्सरसाइजपर्यंत सगळ्याच गोष्टींची मदत घेतात.
(Image Credit : Eat This, Not That!)
अनेकजण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते डाएटपासून ते एक्सरसाइजपर्यंत सगळ्याच गोष्टींची मदत घेतात. पण तरी सुद्धा त्यांचं वजन कमी होत नाही. त्यानंतर काही लोक वजन करण्यासाठी पर्याय म्हणूण औषधाकडे बघतात. पण अशात हे जाणूण घेणं गरजेचं आहे की, वजन कमी करण्यासाठी जे औषध वापरलं जातं, ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असं किंवा नाही?
(Image Credit : 10bestshop.com)
सामान्यपणे जे लोक डाएट किंवा एक्सरसाइजने वजन कमी करू शकत नाहीत. अशांना डॉक्टर औषधांचा पर्याय देतात. त्यासोबतच ज्यांच्या शरीराराचा मास इंडेक्स ३० पेक्षा अधिक असतो आणि जे डायबिटीस किंवा हाय बीपीचे रूग्ण आहेत आणि गंभीरत स्थितीत आहेत. अशांना औषधं दिली जातात. या टॅबलेट्सबाबत दावा केला जातो की, याने भूक कमी केली जाते आणि फॅट कमी करून तुमचं वजन कमी केलं जातं.
(Image Credit : Healthy Women Over 50)
फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने नुकतीच एका वजन कमी करणाऱ्या डिवाईसला मंजूरी दिली. प्लेनिटी नावाचं हे डिवाइस जेलसिसपासून तयार करण्यात आलं आहे. या डिवाइसची मंजूरी त्या लोकांसाठी देण्यात आली आहे, ज्यांचा बॉडी इंडेक्श कमीत कमी २५ आहे. आणि त्यांना कोणताही आजार नाहीये. कंपनीने दावा केला आहे की, प्लेनिटी नैसर्गिक रूपाने तयार झालेल्या बिल्डींग ब्लॉक्स सेल्यूलोज आणि सायट्रिक अॅसिडपासून तयार पहिलं वेट मॅनेजमेंट आहे. पण अजून हे विक्रीसाठी उपलब्ध झालेलं नाही.
कसं करतं काम?
फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशननुसार, प्लेनिटीचा वापर डाएट आणि एक्सरसाइजच्या संयोजनासाठी केला जातो. त्यासोबतच याला वजन कमी करणाऱ्या औषधांसोबत घेतलं जातं. प्लेनिटी एक हायड्रोजेल कॅप्सूल आहे, जे सेल्यूलोज आणि सायट्रिक अॅसिड मिळून तयार झालं आहे. ३ कॅप्सूल लंच किंवा डिनरच्या २० मिनिटांआधी घेतल्या जातात.
या कॅप्सूलबाबत कंपनीने दावा केला आहे की, विना कॅलरी याने तुमचं एक चतुर्थांश पोट भरलं जातं आणि भूक कमी लागते. त्यासोबतच पचनक्रियाही याने चांगली होते.
(Image Credit : Salisbury Business Journal)
या रिसर्चमध्ये असंही समोर आलं की, प्लेनिटीचा वापर करून ६ महिन्यात १० टक्के लोकांनी त्यांचं वजन कमी केलं. या रिसर्चमधून असंही समोर आलं की, जे प्लेनिटीचा वापर करतात, त्यांची वजन कमी करण्याची शक्यता अधिक असते.
प्लेनिटीच्या परीक्षणातून समोर आलं की, याचे साइड इफेक्ट एका साखरेच्या गोळीप्रमाणे आहे. त्यासोबतच पोट फुगणे, पोट दुखणे इत्यादी लक्षणेही दिसतात. कंपनी इशारा दिला आहे की, गर्भवती महिला, आजार असलेले लोक, अॅलर्जी असलेल्या लोकांनी याचा वापर करू नये.
(टिप : वरील लेखातील मुद्दे केवळ माहिती म्हणूण देत आहोत. जर तुम्ही वजन करण्याचा विचार करत असाल तर सर्वातआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. वजन कमी करण्यासाठी ही कॅप्सूल फायदेशीर ठरतही असेल, पण त्यापेक्षा तुमची लाइफस्टाइल तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करू शकते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही चांगली डाएट आणि शारीरिक रूपाने अॅक्टिव रहा. असं केल्याने वजन तर कमी होईलच सोबतच आरोग्यही चांगलं राहील. म्हणजे तुम्हाला गोळ्या घ्याव्या लागणार नाहीत.)