Health tips: ब्लड प्रेशरवर अत्यंत गुणकारी आहे 'हा' सुगंधी पदार्थ, गंभीर आजारांवर आहे अत्यंत फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 04:07 PM2022-05-25T16:07:25+5:302022-05-25T16:15:40+5:30

सुगंध आणि चवीसाठी वापरली जाणारी वेलची, जिला हिरवी वेलची किंवा छोटी वेलची देखील म्हणतात. ती आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

cardamom or elaichi benefits | Health tips: ब्लड प्रेशरवर अत्यंत गुणकारी आहे 'हा' सुगंधी पदार्थ, गंभीर आजारांवर आहे अत्यंत फायदेशीर

Health tips: ब्लड प्रेशरवर अत्यंत गुणकारी आहे 'हा' सुगंधी पदार्थ, गंभीर आजारांवर आहे अत्यंत फायदेशीर

Next

वेलची जवळजवळ दररोज माऊथ फ्रेशनर म्हणून आणि विविध पदार्थांमध्ये सुगंधासाठी वापरली जाते. त्यामुळे जेवणाची चव वाढवण्यासाठी खडा मसाला म्हणून वेलचीचा भरपूर वापर केला जातो. सुगंध आणि चवीसाठी वापरली जाणारी वेलची, जिला हिरवी वेलची किंवा छोटी वेलची देखील म्हणतात. ती आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर आहे. healthline.com ने दिलेल्या माहितीनुसार वेलची खाणे आपल्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते, याबाबत जाणून घेऊया.

तोंडाची दुर्गंधी-
दातांमध्ये पोकळी निर्माण होणे आणि श्वासात दुर्गंधी येणे ही खूप कॉमन समस्या आहे. पण ही समस्या जितकी कॉमन वाटत असली तरी तितकीच त्रासदायक आहे. दुर्गंधी घालवण्यासाठी वेलची तुम्हाला मदत करू शकते. याचे कारण असे की, वेलची तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास आणि पोकळी रोखण्यास मदत करते.

रक्तदाब नियंत्रण -
वेलची रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. वेलचीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट आणि लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ रक्तदाब कमी करण्यास मदत करतो.

पचनाच्या समस्या -
आजकालच्या जीवनशैलीत अपचन, गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या असणे अगदी कॉमन आहे. ही समस्या दूर करण्यात वेलचीही चांगली भूमिका बजावू शकते.

संसर्ग होत नाही -
ऋतू बदलामुळे होणारे विविध प्रकारचे फंगल इन्फेक्शन, फूड पॉयझनिंग आणि पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठीही तुम्ही वेलचीची मदत घेऊ शकता. याचे कारण असे की वेलचीमध्ये असलेले आवश्यक तेले आणि अर्क विविध प्रकारच्या जीवाणूंविरूद्ध लढण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.

रक्तातील साखरेची पातळी -
वेलची उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. उंदरांवरील अभ्यासात असे दिसून आले आहे की, वेलची उच्च रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.

उलट्या, अस्वस्थता -
वेलचीचा उपयोग पचनशक्ती राखण्यासाठी तसेच अस्वस्थता, मळमळ आणि उलट्या यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. वेलची इतर औषधी मसाल्यांमध्ये मिसळून देखील वापरले जाते.

Web Title: cardamom or elaichi benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.