वेलचीच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल अवाक्, जाणून घ्या कसं तयार कराल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 06:07 PM2023-09-06T18:07:14+5:302023-09-06T18:07:32+5:30

Cardamom Water Health Benefits: वेलचीचे आरोग्याला अनेक फायदे होतात. सोबतच याच्या पाण्याने तर शरीराला अनेक फायदे मिळतात. 

Cardamom water health benefits and how to prepare it | वेलचीच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल अवाक्, जाणून घ्या कसं तयार कराल!

वेलचीच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल अवाक्, जाणून घ्या कसं तयार कराल!

googlenewsNext

Cardamom Water Health Benefits: पाणी हे आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण असंही काही खास पाणी असतं जे तुम्हाला अधिक फायदा देतं. वजन कमी करण्यासाठी भरपूर साधं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण साधं पाणी पिऊनही तुमचं वजन कमी होत नसेल तर तुम्ही वेलचीचं खास पाणी पिऊ शकता. वेलचीचे आरोग्याला अनेक फायदे होतात. सोबतच याच्या पाण्याने तर शरीराला अनेक फायदे मिळतात. 

वेलचीच्या पाण्याने वजन कसं कमी होतं?

वेलचीमध्ये मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, कॅल्शिअम हे तत्व असतात. ज्यांनी आपल्या आरोग्याला वेगवेगळे फायदे मिळतात. आपल्या शरीरातील चरबी बर्न करण्यासोबतच वेलचीने वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. मात्र, या पाण्याचं सेवन सुरू करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा

फायदे

- वेलचीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट तत्व असतात आणि याने तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासही मदत मिळते.

- एका रिपोर्टनुसार, वेलचीमध्ये कॅन्सरच्या पेशींसोबत लढण्याची क्षमता असणारे तत्वही असतात.

- तसेच वेलचीने तुमची पचनासंबंधी समस्याही दूर होण्यास मदत होते.

- वेलचीने तोंडातील बॅड बॅक्टेरिया मारले जातात आणि कीड लागण्यापासूनही बचाव होतो.

- वेलचीने हाय शुगर लेव्हल कमी करण्यास मदत मिळते. 

कसं तयार कराल वेलचीचं पाणी?

5 ते 6 वेलची सोलून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी गरम करा. तुमचं वेलचीचं पाणी सेवनासाठी तयार आहे. आता हे पाणी तुम्ही दिवसातून 3 ते 4 वेळा सेवन करू शकता. एका दिवसात साधारण 1 लिटर वेलचीचं कोमट पाणी तुम्ही सेवन करू शकता. काही लोक असाही दावा करतात की, 14 दिवस लागोपाठ तुम्ही वेलचीचं पाणी सेवन केलं तर तुमचं वजन कमी होऊ लागेल.

वेलचीचं पाणी सेवन केल्याने तुमची क्रेविंग नष्ट होते. तसेच याने तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अनहेल्दी पदार्थ खाण्यापासूनही रोखलं जातं. सकाळी उठल्यावर अनोशा पोटी तुम्ही या पाण्याचं सेवन कराल तर याचा प्रभाव अधिक दिसू शकेल. वजन कमी होण्यासोबतच या पाण्याचं सेवन केल्याने त्वचेवरही ग्लो येतो.

Web Title: Cardamom water health benefits and how to prepare it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.