बापरे! 17 वर्षीय मुलाचा कार्डियक अरेस्टने, 14 वर्षीय देवांशचा हार्ट अटॅकने मृत्यू, डॉक्टर हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 02:59 PM2023-07-04T14:59:26+5:302023-07-04T15:06:08+5:30
एका मुलाचं वय 14 वर्षे, तर दुसऱ्या मुलाचं वय 17 वर्षे आहे. दोन्ही मुलांच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
40 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना कार्डियक अरेस्ट आणि स्ट्रोक येत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. पण याच दरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. एका मुलाचं वय 14 वर्षे, तर दुसऱ्या मुलाचं वय 17 वर्षे आहे. दोन्ही मुलांच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रिपोर्टनुसार, जुनागड जिल्ह्यातील चोरवाडजवळील शेतात एका 17 वर्षीय मुलाचा कार्डियक अरेस्टने मृत्यू झाला.
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, राजकोटच्या गोंडल हायवे रोडवरील रिबडाजवळील SGVP गुरुकुल येथे गुरुपौर्णिमेच्या विशेष प्रसंगी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान देवांश भयानी नावाचा 14 वर्षीय मुलगा अचानक बेशुद्ध पडला. त्यानंतर मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, त्याचा मृत्यू झाला. त्याचवेळी जुनागडमधील चौवड गावातील शेतात 17 वर्षीय जिग्नेश वाजा हा अचानक बेशुद्ध पडला आणि त्याचा मृत्यू झाला.
दोन्ही मुलांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. जिग्नेश वाजा यांचा मृत्यूही कार्डियक अरेस्टने झाल्याचे जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर हितेश धोलिया यांनी सांगितले. राजकोट शहरातील रिबडा गावात एसजीवीपी गुरुकुलचा 14 वर्षीय देवांश भयानी सोमवारी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात स्टेजवर पडला. मृत्यूनंतर देवांश भयानी यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. ज्यामध्ये तो हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डिओमायोपॅथी (HOTC) नावाच्या हृदयविकाराने ग्रस्त असल्याचं आढळून आलं.
या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये देवांश भयानी कार्यक्रमादरम्यान अचानक स्टेजवर बेशुद्ध पडतो. भयानी याचे शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा त्यांना हृदयविकाराचा आजार असल्याचे डॉक्टरांच्या पथकाला समजले. ज्यावर कदाचित योग्य वेळी उपचार झाले नाहीत. राजकोट सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की पोस्टमॉर्टम अहवालात असे दिसून आले आहे की मुलगा आधीच HOTC या हृदयविकाराने ग्रस्त होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.