कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये काय आहे फरक? दोनपैकी काय जास्त खतरनाक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 10:01 AM2023-03-10T10:01:03+5:302023-03-10T10:02:11+5:30
Cardiac arrest vs Heart attack differences : अनेक लोक आजही कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅकवरून कन्फ्यूज होतात. पण या दोन्ही समस्यांमध्ये बराच फरक आहे. आज तोच फरक आम्ही सांगणार आहोत.
Cardiac arrest vs Heart attack differences : बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं 66 वयात कार्डियक अरेस्टने निधन झालं. गेल्या काही वर्षात हृदयासंबंधी आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. आधी खूप जास्त वयात हृदयरोगांच्या केसेस समोर येत होत्या. तेच आजकाल कमी वयातच हे आजार होतात. तरूणांनाही कार्डियक अरेस्ट येऊ शकतो. अनेक लोक आजही कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅकवरून कन्फ्यूज होतात. पण या दोन्ही समस्यांमध्ये बराच फरक आहे. आज तोच फरक आम्ही सांगणार आहोत.
कार्डियक अरेस्ट काय आहे?
जेव्हा मनुष्याच्या हृदयाची धडधड बंद होते आणि शरीरातील इतर अवयवांमध्ये रक्त पुरवठा होत नाही त्या स्थितीला कार्डियक अरेस्ट म्हटलं जातं.
नेमकं काय होतं?
जेव्हा एखाद्या व्यक्तीला कार्डियक अरेस्ट येतो तेव्हा ती व्यक्ती काही मिनिटांसाठी बेशुद्ध होते. चिंतेची बाब ही आहे की, जर यात वेळीच उपचार केले नाही तर व्यक्तीचा जीवही जातो.
कार्डियक अरेस्टची कारणं
कार्डियक अरेस्टबाबत सगळ्यात जास्त चिंतेची बाब म्हणजे हा कुणालाही येऊ शकतो. अनेकदा हार्ट अटॅकही याचं कारण ठरू शकतो. त्याशिवाय जर एखाद्या व्यक्तीच्या हृदयाच्या मांसपेशी कमजोर असेल तर या कारणानेही कार्डियक अरेस्ट येऊ शकतो.
काय आहे हार्ट अटॅक?
हार्ट अटॅक कार्डियक अरेस्टपेक्षा वेगळा असतो आणि कार्डियक अरेस्टपेक्षा कमी घातक असतो. जेव्हा हृदयापर्यंत रक्त पोहोचवणाऱ्या धमण्यांमध्ये अडथळा निर्माण होतो किंवा धमण्या 100 टक्के ब्लॉक होतात, त्या स्थितीत व्यक्तीला हार्ट अटॅक येतो.
हार्ट अटॅकमध्ये काय होतं?
हार्ट अटॅक येण्याआधी व्यक्तीमध्ये वेगवेगळी लक्षण दिसू लागतात. यात छातीत वेदना होणे किंवा छातीत जडपणा वाटणे अशी सामान्य लक्षण आहेत. त्याशिवाय श्वास भरून येणे, घाम येणे किंवा उलटी होणे हेही लक्षण आहेत. ही लक्षण लगेच किंवा काही तासांनी समोर येतात.
हार्ट अटॅकची कारणं
हार्ट अटॅक येण्याचं कारण तुमची खराब लाइफस्टाईल असू शकते. जर तुमची लाइफस्टाईल चांगली नसेल तर तुम्ही स्वत: तुम्हाला या स्थितीत नेऊ शकता. आजकाल लोकांच्या चुकीच्या खाण्या-पिण्या किंवा पुरेशी झोप न घेणे किंवा एक्सरसाइज न करे ही हार्ट अटॅकची सामान्य कारणे असू शकतात.
दोन्हींपासून बचावाचे उपाय
कार्डियक अरेस्टपासून बचावासाठी काही उपाय करू शकता. एक्सपर्ट्स सांगतात की, हार्टची योग्य ती काळजी घेतली तर हार्टसंबंधी आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही तुमची लाइफस्टाईल हेल्दी ठेवा, योग्य आहार घ्या, रोज एक्सरसाइज करा, वजन कमी ठेवा, तणाव कमी करा, स्मोकिंग-अल्कोहोलचं सेवन करू नये, वेळेवेळी डॉक्टरांना संपर्क करत रहा.