नेहमी थकवा असतो किंवा श्वास कमी झालाय? या लक्षणांवरून जाणून घ्या हार्ट वॉल्व झाले आहेत ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 12:56 PM2023-02-16T12:56:03+5:302023-02-16T12:57:06+5:30
Valvular disease : वॉल्वचे रोग मुख्य रूपाने दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे स्टेनोसिस किंवा रिगर्जेटेशन. कठोरतेमुळे उघडण्यास असमर्थ असण्याला स्टेनोसिस म्हटलं जातं आणि बंद करण्यास असमर्थ असल्यास बॅक लीकिंगला रेगुर्गिटेशन म्हटलं जातं.
Valvular disease : भारत आणि इतरही अनेक देशांमध्ये वल्वुलर डिजीज (Valvular disease) सगळ्यात कॉमन हृदयरोगांपैकी एक आहे. या आजाराबाबत जाणून घेण्याआधी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की, वॉल्व काय आहे. हृदयामध्ये 4 वॉल्व असतात. हृदय जिवंत ठेवण्यासाठी एका वॉल्वमधून दुसऱ्या वॉल्वमध्ये ब्लड फ्लो सुरू असतो आणि नंतर ते शरीरात पंप केलं जातं. रक्त एका वॉल्वमधून दुसऱ्यामध्ये जाण्यासाठी एका द्वारातून जावं लागतं. जे एका दिशेकडे निघतं. या दरवाज्यांना वॉल्व म्हटलं जातं.
वल्वुलर डिजीजचे प्रकार?
या वॉल्वचे रोग मुख्य रूपाने दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे स्टेनोसिस किंवा रिगर्जेटेशन. कठोरतेमुळे उघडण्यास असमर्थ असण्याला स्टेनोसिस म्हटलं जातं आणि बंद करण्यास असमर्थ असल्यास बॅक लीकिंगला रेगुर्गिटेशन म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीला वल्वुलर डिजीज झाला तर एका किंवा त्यापेक्षा जास्त वॉल्वमध्ये अडथळा निर्माण होतो.
वल्वुलर डिजीजची लक्षणं
हूशिंग साउंड ज्याला डॉक्टर स्टेथोस्कोपने ऐकू शकतात
छातीत वेदना
पोटावर सूज
थकवा
श्वास घेण्यास त्रास, खासकरून झोपल्यावर
टाचा आणि पायांवर सूज
चक्कर येणे
बेशुद्ध पडणे
वल्वुलर डिजीजची कारणं
रूमेटिक हार्ट डिजीज
डिजेनरेटिव वॉल्व डिजीज
हार्ट अटॅक
कार्डियोमायोमाथिस
थायरॉयड रोग
डायबिटीज मेलेटस
हाय ब्लड प्रेशर
रेडिएशन थेरपी
जेनेटिक हार्ट डिजीज
पेसमेकर लावलेलं असणे किंवा एआईसीडी लीड इत्यादी
वल्वुलर डिजीजचं निदान आणि उपचार
डॉक्टरांनुसार, वल्वुलर डिजीजला रोखण्याच्या उपायांमध्ये लोकांना त्वचा रोग आणि घशात खवखव रोखणं गरजेचं आहे. ज्यासाठी दात आणि तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी लागेल. जर कुणाला रूमेटिक फिवर असेल, त्याला प्रोफिलॅक्सिस रूपात इंजेक्शन पेनिसिलिन दिलं जातं. जर व्यक्ती रूमेटिक फिवर आहे, पण कार्डाइटिस नसेल तर 5 वर्ष किंवा व्यक्तीच्या 21 वर्षापर्यंत इंजेक्शन दिलं जातं. जर कार्डिटिस आहे, पण कोणतंही वल्वुलर डॅमेज नाही तर prophylactic इंजेक्शन दिलं जातं.
वल्वुलर डिजीजपासून बचावाचे उपाय
1) कमी मीठ असलेला आहार घ्या
2) नियमितपणे एक्सरसाइज करा
3) वजन वाढू देऊ नका
4) धूम्रपान आणि दारूचं सेवन टाळा
5) तणाव घेऊ नका
6) योग आणि मेडिटेशनसाठी वेळ काढा
7) सोशल मीडिया, मोबाइल, व्हिडीओ गेम टाळा