सावधान, हायपर टेन्शननी होते किडनी निकामी, येऊ शकतो हार्ट अटॅक

By admin | Published: May 23, 2017 04:29 PM2017-05-23T16:29:04+5:302017-05-23T16:29:04+5:30

18 ते 49 वयोगटातील व्यक्तींना शास्त्रज्ञांचा निर्वाणीचा इशारा

Careful, hypertension occurs in kidney failure, heart attack | सावधान, हायपर टेन्शननी होते किडनी निकामी, येऊ शकतो हार्ट अटॅक

सावधान, हायपर टेन्शननी होते किडनी निकामी, येऊ शकतो हार्ट अटॅक

Next

 - मयूर पठाडे

 
टेन्शन कोणाला नसतं? आजकाल तर लहान लहान चिमुरडीही टेन्शनच्या नावानं डोक्याला हात लावून नाहीतर कुठेतरी शुन्यात हरवून बसलेली आपल्याला दिसतात. आपल्या लाइफस्टाइलनं हे टेन्शन घराघरात जन्माला घातलं आहे हे खरं, पण त्यापासून वाचायचं कसं?
अमेरिकेत नुकतंच झालेलं नवं संशोधन तर सांगतं, तरुण आणि मध्यमवयातील लोकांमध्ये जर हायपर टेन्शन असेल तर त्यांनी वेळीच काळजी घ्या, नाहीतर हळूहळू त्यांची अख्खी बॉडीच डॅमेज होईल.
आपलं ब्लड प्रेशर 80-120 या र्मयादेत आहे, म्हणजे आपलं अगदी उत्तम चाललं आहे असं अनेकांना वाटत असतं. यापैकी समजा हाय किंवा लो ब्लड प्रेशरमध्येच थोडीफार गडबड असेल, म्हणजे ती र्मयादा थोडीशीच ओलांडली असेल तर अनेकांना वाटतं, आपल्याला तसा काही धोका नाही. आजूबाजूलाही त्याबद्दल ‘चालसे’ असंच धोरण असल्याची अनेक माणसं आपल्याला दिसतात. त्यामुळे दुर्लक्ष होतं. 
शास्त्रज्ञांनी सांगितलं, समजा तुमच्या ब्लड प्रेशरची न्यूनतम पातळी बरोबर आहे, पण उच्च पातळीची र्मयादा जर 120 वरुन 140 वर गेलेली असेल, तर तुम्ही फारच सावधान राहायला हवं. 
त्यातही 18 ते 49 वयातील स्त्री, पुरुषांना दक्षतेचा इशारा देताना शास्त्रज्ञ सांगतात, तुमच्या हायपर टेन्शनकडे दुर्लक्ष करू नका. तातडीनं त्यावर उपचार करा. आपली लाइफस्टाइल बदला. नाहीतर हे हायपर टेन्शन हळूहळू तुमचं शरीर पोखरत जाईल. भविष्यातलं तुमचं जगणं त्यामुळे फारच अवघड होईल.
 
 
काय होतं हायपर टेन्शननं?
1- हायपर टेन्शनमुळे तुमच्या किडनीवर प्रेशर येतं आणि ती डॅमेज होऊ शकते.
2- सतत टेन्शन घेण्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅकही येऊ शकतो.
3- तुमच्या शरीरात हृदयापासून तर संपूर्ण शरीरभर ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्ताचा पुरवठा करणार्‍या नसमध्ये बिघाड होऊ शकतो. 
4- हृदयविकाराला तुम्ही बळी पडू शकता.
5-इतरही अनेक आजार तुमच्या शरीरात घर करू शकतात.
 
शास्त्रज्ञांनी या विषयावर अनेक व्यक्तींवर बरीच वर्षे संशोधन केलं. त्यांच्यावर हायपर टेन्शनचा काय आणि किती परिणाम होतो हे तपासलं आणि हा निष्कर्ष काढला आहे. 
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार नुसत्या अमेरिकेतच गेल्या दोन दशकांत हायपर टेन्शनचं प्रमाण जवळजवळ दुप्पट झालं आहे. त्यात वाढच होत आहे. यात येत्या पाच वर्षांत किमान पाच टक्के वाढ होईल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. 
येत्या काळात हायपरटेन्शन लवकरात लवकर समजू शकेल यासाठी काय करता येईल यावर शास्त्रज्ञ संशोधन करीत आहे, मात्र तोपर्यंत डॉक्टरांनाही त्यांनी सल्ला दिला आहे, हायपर टेन्शन असलेल्या व्यक्तींवर तातडीने उपचार करा. त्यांना त्यांची लाइफस्टाइल समजावून सांगा. वेळ निघून गेल्यावर फार उपयोग होणार नाही.
शास्त्रज्ञांचा हा सल्ला आपण सार्‍यांनीच गंभीरपणे घ्यायला हवा. 

Web Title: Careful, hypertension occurs in kidney failure, heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.