​सतत स्क्रीनसमोर असणा-यांनी डोळ्यांची घ्या काळजी !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 10:46 AM2018-04-09T10:46:17+5:302018-04-09T16:16:17+5:30

कमी वयातच डोळ्यांच्या गंभीर समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.परंतू तुमच्या दैनदिन आहारात तुम्ही काही पथ्य पाळली तर तुमच्या डोळ्यांचे आरोग्य राखता येईल.

Carefully take care of the eyes in front of the screen! | ​सतत स्क्रीनसमोर असणा-यांनी डोळ्यांची घ्या काळजी !

​सतत स्क्रीनसमोर असणा-यांनी डोळ्यांची घ्या काळजी !

Next
ल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव म्हणजे डोळा होय.डोळ्यांशिवाय आपण हे सुंदर जग पाहूच शकत नाही.मात्र बहुतांश लोक डोळ्यांकडे दुर्लक्ष करतात.सध्याच्या काळात संगणक आणि स्मार्टफोनचा वापर जास्त प्रमाणात वाढला आहे.या गोष्टींचा वापर जरी तुमच्या प्रगतीसाठी आवश्यक असला तरी याचे गंभीर परिणाम तुमच्या डोळ्यांवर होतात. त्यामुळे डोळ्यांचे विविध विकार वाढत आहेत.कमी वयातच डोळ्यांच्या गंभीर समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.परंतू तुमच्या दैनदिन आहारात तुम्ही काही पथ्य पाळली तर तुमच्या डोळ्यांचे आरोग्य राखता येईल.

* हिरव्या पालेभाज्या 
फळे आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅरोटीन तसेच व्हिटॅमिन्स भरपूर प्र्रमाणात असताता,यामुळे डोळ्यांची कार्यक्षमता वाढते.त्यामुळे आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश अवश्य असावा. 

* अक्रोड
अक्रोडमध्ये ई जीवनसत्त्वे आणि फॅटी अ‍ॅसिड्स मोठ्या प्रमाणात असतात. हे घटकपदार्थ डोळ्यांच्या पेशी मजबूत करतात आणि त्यांचे आयुष्यही वाढवतात.

* वेलची
वेलचीमुळे डोळ्यांना थंडावा मिळतो आणि त्यांची शक्ती कायम राहते.वेलची दुधात टाकून ती पिण्याने दृष्टी चांगली राहते.

* जीवनसत्त्व 
अ, क आणि ई जीवनसत्त्वांचा समावेश असलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे रेटीनावर वाढत्या वयाचा प्रभाव पडत नाही.

* बदाम 
रात्री पाण्यात किंवा दुधात बदाम भिजवून ते सकाळी खाल्ल्यास डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात. बदामामुळे स्मरणशक्तीसुद्धा चांगली राहते. 

Web Title: Carefully take care of the eyes in front of the screen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.