कैरीचे असेही फायदे जे तुम्हाला माहित नसतील, वाचून विश्वास बसणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 09:24 PM2021-06-16T21:24:59+5:302021-06-16T21:25:42+5:30
कैरीची नुसती फोड जरी दिसली तरीही तोंडाला पाणी सुटतं. कैरी अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरलने समृद्ध आहे. इतर ऋतूंमध्ये जरी कैरी उपलब्ध नसली तरी त्याचे लोणचे, पन्ह असे पदार्थ करून आपण साठवून ठेऊ शकतो. चला बघुया कैरीचे काय फायदे आहेत....
आंबा हा फळांचा राजा असला तरी कैरी अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे. कैरीचे लोणचे म्हणजे खव्वय्यांचा जीव की प्राण. कैरीची नुसती फोड जरी दिसली तरीही तोंडाला पाणी सुटतं. कैरी अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरलने समृद्ध आहे. इतर ऋतूंमध्ये जरी कैरी उपलब्ध नसली तरी त्याचे लोणचे, पन्ह असे पदार्थ करून आपण साठवून ठेऊ शकतो. चला बघुया कैरीचे काय फायदे आहेत....
- कैरीच्या योग्य सेवनाने शरीराला पोटॅकैरीमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते यामुळे एलक्ट्रोलयट्स चे प्रमाण राखण्यास मदत होते आणि रक्तदाबावर नियंत्रण राहते तसेच हृदय विकारावरील धोकाही कमी करता येतो.
- कच्च्या कैरीमधील ऑस्ट्रीजन गुणधर्म त्वचेवर तेल आणि मळ जमा होऊ देत नाही. एक कप पाण्यात कैरीचा फोड उकळा आणि हे पाणी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा.
- धावपळीच्या युगात आपण वेळेवर जेवण करत नसल्याने पित्त, अपचन होणं ही सामान्य समस्या बनली आहे. मात्र आपण जर कैरी खाल्याने अॅसिडीटी कमी होण्यास मदत होते.
- शियमचा पुरवठा होतो. रक्तदाब नियंत्रण राखण्यास मदत होते, कैरीमधून फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
- आपल्या डोळ्यांना दृष्टी कमी असेल तर काही दिवस कैरीचे सेवन केल्याने आपली दृष्टी सुधारण्यास मदत होते.
- कैरीमध्ये भरपूर प्रमाणात विटाकेरोटीन आणि व्हिटॅमिन A असतं. आंब्यात असणारे केरोटीनाईट्स त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करते. कैरीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
- तोंडाला दुर्गंधी, हिरड्यांमधून रक्त येणं, दातांच्या इतर समस्यांवरही कैरी फायदेशीर आहे. मजबूत आणि स्वच्छ दात हवे असल्यास कैरीचं सेवन आवर्जून करावं.