बीएएमएसच्या ८० टक्के प्रवेशावर रोख
By admin | Published: October 3, 2015 12:20 AM2015-10-03T00:20:29+5:302015-10-03T00:20:29+5:30
बीएएमएसच्या ८० टक्के प्रवेशावर रोख
Next
ब एएमएसच्या ८० टक्के प्रवेशावर रोख -विद्यार्थी अडचणीत : यंत्रसामुग्री व शिक्षकांची कमीनागपूर : राज्यातील मेडिकल महाविद्यालयांतील एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत, परंतु बीएएमएसची प्रक्रिया रोखण्यात आल्याने विद्यार्थी अडचणीत आले आहे. भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने केलेल्या पाहणीत अनेक त्रुटी आढळून आल्याने सुमारे ८० टक्के महाविद्यालयांमधील प्र्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आल्याची माहिती आहे. यात नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयासह, मुंबई, पुणे आणि नांदेडच्या महाविद्यालयांचा समावेश आहे. शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांत दरवर्षी प्रवेश प्रक्रियेपूर्वी भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेद्वारे तपासणी केली जाते. परिषदेच्या मानकाचे पालन न झाल्यास प्रवेश प्रक्रिया थांबविली जाते. राज्यभरात एकूण ६५ आयुर्वेद महाविद्यालये आहेत. यात चार शासकीय १८ अनुदानित तर उर्वरित खासगी महाविद्यालये आहेत. सूत्राच्या माहितीनुसार उस्मानाबाद येथील महाविद्यालयाला परवानगी देण्यात आली आहे, तर तीन शासकीय महाविद्यालयावर रोख लावण्यात आली आहे. सांगण्यात येते की, सुमारे १०-१२ खासगी महाविद्यालयांनाच प्रथम वर्षाच्या प्रवेशाला मंजुरी देण्यात आली. नागपूर आयुर्वेद महाविद्यालयाच्या बीएएमएस प्रथम वर्षाच्या १०० जागा आहेत. सोबतच याच सत्रात पदव्युत्तरच्या २१ जागांच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेश होणार होते. परंतु या जागांवरील प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आल्या आहेत. -५ ऑक्टोबरपर्यंत दिला वेळसूत्राच्या माहितीनुसार त्रुटी दूर करण्यासंदर्भातील अहवाल सादर करण्यासाठी परिषदेने ५ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे. शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाची एक चमू या दिवशी दिल्लीतील भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेसमोर त्रुटी दूर करण्यासंदर्भातील उपाययोजनांची माहिती देईल. सांगण्यात येते की, महाविद्यालयांमधील उपकरणांची कमी, लेक्चर आणि काही विषयांचे प्राध्यापक नसल्याने या महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेवर रोख लावण्यात आली आहे. जर रोख हटविण्यात आली तर बीएएमएसच्या १०० आणि स्नातकोत्तरच्या २१ जागांवर प्रवेश दिले जातील.बॉक्स... -मुख्यमंत्री पुढाकार घेतील का?शनिवार ३ ऑक्टोबर रोजी नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी, वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे येणार आहेत. महाविद्यालयातील त्रुटींमुळे रोखण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी ही सर्व नेते मंडळी पुढाकार घेतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.