उन्हाळ्यात खा 'हा' सुकामेवा; त्वचा, केस आणि एकंदरीत संपूर्ण आरोग्यावर रामबाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 06:18 PM2022-05-01T18:18:30+5:302022-05-01T18:21:02+5:30

काजूमध्ये प्रोटीन, मिनरल्स, आयर्न, फायबर, फोलेट, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सेलेनियम, अँटी-ऑक्सिडेंट्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे गुणधर्म आढळतात. यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहतात. त्याविषयी जाणून (Cashew For Skin And Hairs) घेऊया.

cashew a day is extremely beneficial for health skin and hair | उन्हाळ्यात खा 'हा' सुकामेवा; त्वचा, केस आणि एकंदरीत संपूर्ण आरोग्यावर रामबाण

उन्हाळ्यात खा 'हा' सुकामेवा; त्वचा, केस आणि एकंदरीत संपूर्ण आरोग्यावर रामबाण

Next

उन्हाळ्यात आरोग्यासोबतच केस आणि त्वचेची काळजी घेणेही गरजेचे असते. जेव्हा त्वचा आणि केसांचा प्रश्न येतो तेव्हा आपण ब्युटी प्रोडक्‍टवर अवलंबून राहू लागतो. ब्युटी प्रोडक्‍टने त्वचा बाहेरून चांगली ठेवता येते. त्वचेला आतून निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक सकस आहाराची गरज असते. काजू हा एक महत्त्वाचा ड्रायफ्रूट आहे, आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी आवश्यक आहे. काजूमध्ये प्रोटीन, मिनरल्स, आयर्न, फायबर, फोलेट, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सेलेनियम, अँटी-ऑक्सिडेंट्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे गुणधर्म आढळतात. यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहतात. त्याविषयी जाणून (Cashew For Skin And Hairs) घेऊया.

सुरकुत्या कमी होतात -
काजू खाल्ल्याने त्वचेवरील सुरकुत्या खूप कमी होतात. काजूमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आढळतात, जे त्वचेला अनेक आरोग्य समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात. काजूच्या सेवनाने सुरकुत्यांची समस्या कमी होते आणि त्वचाही तरुण दिसते.

स्कीन तरुण दिसते-
तुम्ही काजूचा वापर अँटी-एजिंग डाएट म्हणून करू शकता. काजूमध्ये भरपूर प्रथिने आणि व्हिटॅमिन ई असते. हे दोन्ही पोषक घटक त्वचा चमकदार आणि तरुण दिसण्यास मदत करतात.

तेलकट त्वचा -
अनेकांची त्वचा तेलकट असते, त्यामुळे त्यांना त्वचेच्या संसर्गाची समस्या होऊ लागते. तेलकट त्वचेच्या लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. अशा लोकांनी आपल्या आहारात काजूचा समावेश करावा. काजू तेलकट त्वचा कमी करण्यास मदत करेल.

केस निरोगी आणि चमकदार बनतील -
काजूमध्ये मॅग्नेशियम, जस्त, लोह आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक आढळतात, ज्यामुळे केस निरोगी होतात. यासोबतच केस तुटण्याची समस्या कमी करून त्यांना मुलायम आणि चमकदार बनवतात.

Web Title: cashew a day is extremely beneficial for health skin and hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.