Summer health tips: उन्हाळ्यात 'या' फळाच्या सेवनाने वाढेल तुमची प्रतिकारशक्ती, व्हिटॅमिन सी ने आहे समृद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 04:51 PM2022-03-31T16:51:19+5:302022-03-31T16:56:06+5:30
काजूसोबत तुम्ही त्याची फळेही खाऊ शकता. तुम्ही ती कच्ची किंवा शिजवूनही खाऊ शकता. आज काजू फळातील पोषक तत्वे आणि त्याचे फायदे जाणून (Cashew Apple Benefits) घेऊया.
सुक्या मेव्यांमध्ये (Dry Fruit) काजू खाणे बहुतेक लोकांना आवडतं. काजू (Cashew nut) अनेक पोषक तत्वांनीही परिपूर्ण आहे. काजू आपण हेल्दी स्नॅक म्हणूनही खाऊ शकतो. काजूबरोबरच काजू फळही (Cashew fruit) खायला हवीत, कारण तेही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. काजू फळ सुकल्यानंतर काजू मिळतो. काजूसोबत तुम्ही त्याची फळेही खाऊ शकता. तुम्ही ती कच्ची किंवा शिजवूनही खाऊ शकता. आज काजू फळातील पोषक तत्वे आणि त्याचे फायदे जाणून (Cashew Apple Benefits) घेऊया.
काजू फळांना काजू सफरचंद (Cashew Apple) असेही म्हणतात. त्यात झिंक, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, ल्युटीन, मॅग्नेशियम, आहारातील चरबी, फॉस्फरस, फायबर, कार्बोहायड्रेट्स इत्यादी अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक (Benefits of Cashew fruit) असतात.
काजू फळ खाण्याचे फायदे
- नफुडस्पेक्ट्रममध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, काजू फळामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट ल्युटीन डोळ्यांना प्रकाशामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. प्रकाश खराब झाल्यामुळे अंधत्व आणि मोतीबिंदूची समस्या सुरू होऊ शकते.
- काजू फळ खाण तापावर परिणामकारक आहे. याशिवाय पोटाचे आरोग्यही चांगले राहते.
- अॅमेझॉनच्या जंगलात आदिवासी इन्फ्लूएन्झा आणि चामखीळींवर उपचार करण्यासाठी काजूच्या फळापासून तयार केलेला रस वापरतात.
- काजू फळामध्ये असलेले प्रोटीन त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करते.
- गोवा आणि केरळ ही देशातील दोन राज्ये आहेत जी 'फेनी' आणि नॉन-अल्कोहोलिक पेये आणि काजूचा रस, सरबत, जाम, कँडीज, चटण्या आणि लोणचे यासारखी इतर उत्पादने तयार करण्यासाठी काजू फळाचा वापर करतात.
- या फळामध्ये संत्र्यापेक्षा पाचपट जास्त व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
- यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पोटातील अल्सर, गॅस्ट्रिक समस्या दूर करतात.
काजू फळ कसे खावे?
काजू फळ हा पल्पी किंवा त्यामध्ये फक्त गाभा असतो, काजू फळ हे काजूला चिकटलेलं असतं. काजू फळाचे वरचे टोक झाडातून बाहेर पडणाऱ्या देठाला चिकटलेले असते. त्याचे खालचे टोक काजूला जोडलेले असते, जे कवचात बंद असते. वनस्पतिशास्त्रीयदृष्ट्या, काजू हे एक सहायक फळ आहे, जे काजूच्या बियांवर वाढते. हे फळ तुम्ही ताजे खाऊ शकता. आपण ते भाज्यांमध्ये घालू शकता. तुम्ही त्याचा रस बनवून पिऊ शकता. यासोबतच चटणी, जामही बनवता येते. अनेक देशांमध्ये, अनेक प्रकारच्या पेयांची चव वाढवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. त्याची चव गोड तसेच तुरट असते. खाण्यापूर्वी ते चांगले धुवावे किंवा मिठाच्या पाण्यात दोन मिनिटे उकळल्यानंतरच वापरावे, त्यामुळे तुरट चव निघून जाते.
काजू खाण्याचे फायदे
- हृदयाचे कार्य सुधारते
- शरीरातील रक्त प्रवाह सुधारतो
- डोळे निरोगी राहतात
- मधुमेह नियंत्रित करते
- मेंदूचे कार्य सुधारते
- कर्करोगाचा धोका कमी करते.
- त्वचा निरोगी आणि तरुण बनवते
- केस मजबूत, चमकदार बनवते
- हाडांना बळ देते.
- दात आणि हिरड्या निरोगी ठेवतात
- पचन सुधारते
- डोकेदुखी कमी होते.