'या' पाळीव प्राण्यापासून पसरू शकतो कोरोनाचा विषाणू; लांब राहाल तरच निरोगी राहाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 12:13 PM2020-05-17T12:13:35+5:302020-05-17T12:15:40+5:30
पाळीव प्राण्यांपासून कोरोना पसरू शकतो. याबाबत तज्ञांनी रिसर्चमधून मोठा खुलासा केला आहे.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस जगभरासह भारतातही वाढत आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनात असं दिसून आलं की पाळीव प्राण्यांपासून कोरोना पसरू शकतो. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे.
खूप लोकांना मांजरी पाळण्याची आवड असते. लोकांच्या घरी मांजरींचा वावर असतो. तुम्ही सुद्धा मांजरींना जवळ घेत असाल तर सावध राहायला हवं. कारणं संशोधकांनी मांजरींबाबत एक मोठा खुलासा केला आहे. जी मांजर कोरोना व्हायरसने संक्रमित असेल ती मांजर इतर मांजरींना संक्रमित करू शकते. इतकंच नाही तर मांजरींमध्ये कोरोनाची लक्षणं सुद्धा दिसून येत नाहीत. सध्या मांजरींपासून पुन्हा माणसांमध्ये कोरोना व्हायरस पसरतो. का याबाबत संशोधन सुरू आहे.
मांजरीपासून माणसांमध्ये व्हायरसचं संक्रमण होण्याची शक्यता
विस्कॉन्सिन वेटरनरी डायग्नोस्टिक लेबोरेटरीचे प्रमुख कीथ पॉल्सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार माणसांना मांजरींकडून संक्रमण होण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी आपल्या घरातील पाळीव प्राण्याला हात लावणं, कुरवाळणं या कृती करू नयेत. शक्य असेल तितकी स्वच्छता घरात ठेवायला हवी. अन्यथा संक्रमण पसरू शकतं.
विस्कॉन्सिन यूनिव्हरसिटीमधील पीटर आणि त्यांच्या टीमने ने यूनिव्हरसिटीच्या वेटनेरी मेडिसिन लॅबमध्ये एक संशोधन केलं होतं. हे संशोधन करत असताना तज्ञांनी कोरोना व्हायरसने संक्रमित असलेल्या व्यक्तीच्या शरीरातून व्हायरस घेऊन तीन मांजरींना संक्रमित केलं आणि या मांजरींना वेगवेगळ्या जागी ठेवलं. ज्या मांजरी कोरोनाने संक्रमित नव्हत्या अशा मांजरी पाच दिवसात संक्रमित मांजरींच्या संपर्कात आल्यामुळे संक्रमणाच्या शिकार झाल्या होत्या. न्यू इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे.
मांजरींमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली नाही.
तज्ञांनी सांगितले की, मांजरींमध्ये कोरोनाचे एकही लक्षण दिसून आलं नाही, शिंका येणं, खोकला येणं. अशी लक्षणं दिसून येत नव्हती. इतकंच नाही तर या मांजरींच्या शरीरातील तापमान आणि वजन सुद्धा नॉर्मल होतं. मांजरीच्या मालकांना जराही जाणवलं नाही की, मांजरींना कोरोनाचं संक्रमण झालं आहे. गेल्या काही दिवसात न्यूयॉर्कमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाळीव मांजरींमध्ये कोरोना व्हायरसं संक्रमण झालं होतं. शेजारच्या कुटुंबातील संक्रमित लोकांमार्फत मांजरीपर्यंत कोरोनाचे संक्रमण झाल्याचे दिसून आले.
(शरीरात जमा झालेले किटाणू गंभीर आजारांना देऊ शकतात निमंत्रण, 'या' उपायाने राहा निरोगी)
(पुरूषांमधील टेस्टोस्टोरॉन हार्मोन आणि कोरोना विषाणू यांच्यातील संबंध जाणून घ्या)