प्रेमभंग झाल्यावर येऊ शकतो हार्ट अटॅक, नव्या रिर्सचमध्ये धक्कादायक खुलासा, महिलांमध्ये प्रमाण जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 05:33 PM2021-10-27T17:33:25+5:302021-10-27T17:33:36+5:30

या नवीन संशोधनानुसार, प्रेमभंग झाला, वाईट बातमी ऐकली तर त्या अचानक बसलेल्या धक्क्यामुळे छातीत तीव्र वेदना होऊ शकतात. याला ब्रोकन हार्ट सिंड्रोम (Broken Heart Syndrome) म्हणतात.

causes of broken heart syndrome, research says break up or heart break can lead to heart attack | प्रेमभंग झाल्यावर येऊ शकतो हार्ट अटॅक, नव्या रिर्सचमध्ये धक्कादायक खुलासा, महिलांमध्ये प्रमाण जास्त

प्रेमभंग झाल्यावर येऊ शकतो हार्ट अटॅक, नव्या रिर्सचमध्ये धक्कादायक खुलासा, महिलांमध्ये प्रमाण जास्त

googlenewsNext

अनेकदा एखादी वाईट बातमी ऐकली की आपल्याला आपल्या छातीत धडधड वाढल्याची जाणीव होते. अनेकदा जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्याची बातमी ऐकून एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येऊ शकतो. वाईट बातमी ऐकल्यानं एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला, अशा बातम्याही आपण ऐकतो. प्रेमभंग झालेल्या व्यक्तीही ‘दिल के टुकडे हजार हुए’ म्हणत छातीत दुखत असल्याची तक्रार करतात. तेव्हा हृदयाचे आरोग्य का बिघडते असा प्रश्न निर्माण होतो? अचानक झालेले शारीरिक नुकसान किंवा भावनिक ताण यामुळे हृदयविकाराचा झटका आल्यासारखी लक्षणं का दिसतात, हे कसं घडतं, याचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये (American Heart Association Journal) याबाबतचा अभ्यास अहवाल प्रकाशित झाला आहे.

या नवीन संशोधनानुसार, प्रेमभंग झाला, वाईट बातमी ऐकली तर त्या अचानक बसलेल्या धक्क्यामुळे छातीत तीव्र वेदना होऊ शकतात. याला ब्रोकन हार्ट सिंड्रोम (Broken Heart Syndrome) म्हणतात. झी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

ब्रोकन हार्ट सिंड्रोम म्हणजे काय?
हृदयाला रक्तपुरवठा (Blood Circulation) करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम किंवा चरबी साठल्यामुळे हृदयापर्यंत रक्तपुरवठा नीट होत नाही. अशावेळी हृदयविकाराच्या झटक्याची तीव्रता अधिक असते. मात्र एखादा अपघात, वाईट बातमी किंवा प्रेमभंग झाल्यामुळे बसलेला धक्का यामुळेही हृदयाच्या नसांवर अचानक ताण येतो आणि त्या कमकुवत होतात. अशावेळी हृदयात वेदना जाणवतात, याला ब्रोकन हार्ट सिंड्रोममध्ये किंवा ताकोत्सुबो सिंड्रोम असेही म्हणतात. जपानमध्ये (Japan) 90च्या दशकात हा आजार ओळखला गेला. जपानमध्ये याला ताकोत्सुबो कार्डिओमायोपॅथी असे नाव देण्यात आले. तिथे ऑक्टोपस पकडणाऱ्या सापळ्याला ताकोत्सुबो म्हणतात. या संशोधनानुसार, या सिंड्रोमचे प्रमाण स्त्रियांमध्ये विशेषतः 50 ते 70 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये (Women)अधिक म्हणजे 80 ते 90 टक्के असते. याचा अर्थ असा होत नाही की स्त्रियांचे हृदय कमकुवत असते. या वयातील स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती (Menopause) होत असते. या काळात महिलांमध्ये इस्ट्रोजेन हार्मोनची कमतरता निर्माण होते. या कमतरतेमुळे महिलांमध्ये या आजाराचा धोका वाढतो, असे शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.

खरं तर, तणाव आणि अडचणी यांना तोंड देण्याबाबत महिला पुरुषांपेक्षा अधिक सक्षम असतात. त्या अशा परिस्थितीतही लवकर सावरतात, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालं आहे. त्यामुळं या निष्कर्षाबाबत अधिक सखोल संशोधन होण्याची गरज असल्याचं मत फोर्टिस हॉस्पिटलचे (Fortis Hospital) मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मनु तिवारी यांनी व्यक्त केलं आहे.

फोर्टिस हॉस्पिटलच्या कार्डियाक सायन्स विभागाचे अध्यक्ष डॉ. अजय कौल यांच्या मते, असे रुग्ण बरे होऊ शकतात. त्यांचे हृदय पुन्हा मजबूत होऊ शकते. यासाठी त्यांना कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळींचा पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. मानसशास्त्रज्ञ डॉ.मनू तिवारी यांनीही याला दुजोरा दिला असून, प्रेमभंग झाल्यामुळे हृदयरोगाची शिकार ठरलेल्या व्यक्तीला कुटुंबातील सदस्य आणि मित्रांनी फक्त साथ देण्याची गरज आहे. अशा रुग्णांना कोणताही सल्ला न देता त्यांचे म्हणणे ऐकले तरी रुग्ण लवकर बरा होऊ शकतो, असं म्हटलं आहे.

प्रेमभंग झाल्यामुळे मानसिकदृष्ट्या दिल के टुकडे हजार हुए म्हणत दुःखी, कष्टी झालेल्या व्यक्तीला प्रत्यक्षात शारीरिकदृष्ट्याही हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो, मात्र त्यातून ते बरे होऊ शकतात. यासाठी त्यांना घरातील लोकांची आणि मित्रपरिवाराची साथ महत्त्वाची आहे, हे या संशोधनातून समोर आलं आहे.

Web Title: causes of broken heart syndrome, research says break up or heart break can lead to heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.