तुम्ही सतत हातांची बोटे मोडता का? एकदा हे वाचाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 04:38 PM2018-05-23T16:38:03+5:302018-05-23T16:38:03+5:30
प्रश्न हा आहे की काय असं करणं योग्य आहे? असे केल्याने बोटांना आराम मिळतो की नुकसान होतं? याबाबत डॉक्टर अंजू गुप्ता यांनी काही माहिती दिली आहे.
सतत हातांची बोटे मोडण्याची अनेकांना सवय असते. अनेकजण सतत बोटे मोडताना दिसतात. पण प्रश्न हा आहे की काय असं करणं योग्य आहे? असे केल्याने बोटांना आराम मिळतो की नुकसान होतं? याबाबत डॉक्टर अंजू गुप्ता यांनी काही माहिती दिली आहे.
काय ही वाईट सवय आहे?
सतत बोटे मोडल्याने तुम्हाला कोणतीही समस्या होत नाही. काहींचं म्हणंन आहे की, असे केल्याने जॉईंटमध्ये दुखणं होऊ शकतं. पण याबाबत कोणतेही अधिकृत पुरावे नाहीयेत.
बोटे मोडल्याने आराम मिळतो?
बोटे मोडल्याने जॉईंटच्या आजूबाजूच्या मसल्सना आराम मिळतो. हेच कारण आहे की, अनेकजण सतत बोटे मोडतात. हाच याबाबतचं वैज्ञानिक तर्क आहे.
जॉईंटच्या दुखण्याशी काही संबंध आहे का ?
जॉईंटच्या दुखण्यासोबत याचा काहीही संबंध नाहीये आणि यामुळे हाडेही कमजोर होत नाहीत. पण काहींच्या बाबतीत जॉईंट अधिक नाजूक होऊ शकतात. आणि त्यांना हायपर-मोबाईलची समस्या होऊ शकते.
याने हाडांचा आकार प्रभावित होतो?
यावर डॉक्टरांचं म्हणनं आहे की, यामुळे हाडांवर कोणताही फरक पडत नाही.
काय ही जेनेटिक समस्या आहे?
असं काहीही नाहीये. हे कुणीही करु शकतं.