जास्त झोपत असाल तर वेळीच व्हा सावध, रिसर्चनुसार हार्ट अटॅकचा वाढू शकतो धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 11:05 AM2024-08-30T11:05:09+5:302024-08-30T11:06:15+5:30

Over Sleeping Side Effects : जास्त झोपणं आरोग्यासाठी फार नुकसानकारक ठरू शकतं. जास्त झोपल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांचे शिकार होऊ शकता.

Causes of oversleeping know the symptoms and remedies of hypersomnia | जास्त झोपत असाल तर वेळीच व्हा सावध, रिसर्चनुसार हार्ट अटॅकचा वाढू शकतो धोका!

जास्त झोपत असाल तर वेळीच व्हा सावध, रिसर्चनुसार हार्ट अटॅकचा वाढू शकतो धोका!

Over Sleeping Side Effects : आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी झोप पूर्ण होणं फार महत्वाचं आहे. जर दिवसभराच्या थकव्यानंतर पुरेशी झोप मिळाली नाही तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. याच कारणाने एक्सपर्ट्स रोज कमीत कमी ७ ते ८ तासांची झोप घेण्याचा सल्ला देत असतात. तुम्हाला किती तासांच्या झोपेची गरज आहे हे तुमच्या वयावर अवलंबून असतं. कारण वयानुसार झोपेची गरज बदलते. मात्र, जास्त झोपणं आरोग्यासाठी फार नुकसानकारक ठरू शकतं. जास्त झोपल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांचे शिकार होऊ शकता.

झोप पूर्ण झाल्यावर तुम्हाला फ्रेश वाटतं. पण जास्त झोपाल तर तुम्हाला अजिबात फ्रेश वाटणार नाही. जर तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त झोप येत असेल किंवा तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर यामागे काहीतरी कारण असू शकतं. हा हायपरसोमनियाचा संकेत असू शकतो.

काय आहे हायपरसोमनिया?

NCBI च्या रिपोर्टनुसार, या स्थितीमध्ये तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त झोप येते. रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतरही दिवसाही व्यक्तीला झोप येते. तसेच सकाळी झोपेतून उठण्यात समस्या होते किंवा कधी कधी भ्रम होत असणंही हायपरसोमनियाचा संकेत आहे.

जास्त झोपल्याने होणारे आजार

जास्त झोपल्याने वजन वाढतं. त्याशिवाय हृदयरोग, स्ट्रोक आणि इतरही हृदयासंबंधी अनेक गंभीर समस्या होतात. जे लोक रात्री १० तासांपेक्षा जास्त झोपतात त्यांना टाइप २ डायबिटीसचा धोका ५४ टक्क्यांनी अधिक राहतो. जास्त झोपेमुळे डिप्रेशनची समस्या वाढते. याने सुस्ती आणि आळस जाणवतो ज्यामुळे कोणतंही काम करण्याची ईच्छा होत नाही.

शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता

सतत थकवा जाणवणे किंवा पुन्हा पुन्हा झोप येत असल्याने शरीरात व्हिटॅमिन्स कमी होतात. व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन बी ३, व्हिटॅमिन बी ५, बी ६, बी ९, बी १२, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी कमी होताता. या सगळ्यांमध्ये व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन डी सगळ्यात महत्वाचे आहेत.

वयानुसार शरीरात कमी होतं व्हिटॅमिन बी १२

जसजसं वय वाढतं शरीरात पोषक तत्व कमी होऊ लागतात, पण वाढत्या वयासोबत यांची गरज अधिक वाढत असते. एक्सपर्टनुसार, वाढत्या वयात अशा गोष्टींचं सेवन केलं पाहिजे ज्यामुळे शरीराला भरपूर व्हिटॅमिन बी १२ मिळेल. शरीरातील सगळ्या कोशिका योग्यपणे वाढण्यासाठी व्हिटॅमिन बी १२ गरजेचं असतं. 

जास्त झोप येणं टाळण्याचे उपाय

वेळेवर झोपण्याची आणि सकाळी वेळेत झोपेतून उठण्याची सवय लावा

झोपण्याआधी कॅफीन आणि मद्यसेवन टाळा

बेडरूममध्ये अंधार करून झोपा

पौष्टिक आहार घ्या, हिरव्या पालेभाज्या आणि फळांचं सेवन करा

नियमितपणे हलका व्यायाम करा

Web Title: Causes of oversleeping know the symptoms and remedies of hypersomnia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.