पाइल्समुळे जगणं अवघड झालंय? लगेच या 4 गोष्टी टाळा, होईल फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 10:36 AM2023-03-24T10:36:14+5:302023-03-24T10:36:31+5:30

Piles Harmful Foods : आज आम्ही सांगणार आहोत की, पाइल्स असेल तर कोणते पदार्थ किंवा भाज्या खाऊ नये. 

Causes of piles and its control home remedies | पाइल्समुळे जगणं अवघड झालंय? लगेच या 4 गोष्टी टाळा, होईल फायदा

पाइल्समुळे जगणं अवघड झालंय? लगेच या 4 गोष्टी टाळा, होईल फायदा

googlenewsNext

Piles Harmful Foods : पाइल्स म्हणजेच मूळव्याधचा विषय जरी काढला तर लोक चिंतेत पडतात. जगात आजकाल बरेच लोक या समस्येने हैराण आहेत. पण बरेच लोक याबाबत कुणाला सांगत नाहीत आणि डॉक्टरांकडेही जाणं टाळतात. ज्यामुळे ही समस्या वाढत जाते. मुळात ही समस्या खाणं-पिणं आणि लाइफस्टाईलशी संबंधित आहे. जर या दोन गोष्टींची काळजी घेतली गेली तर पाइल्सची समस्या लगेच दूर होते. आज आम्ही सांगणार आहोत की, पाइल्स असेल तर कोणते पदार्थ किंवा भाज्या खाऊ नये. 

कमी करा चहा-कॉफीचं सेवन

पाइल्सची समस्या तेव्हा होते जेव्हा एखादी व्यक्ती जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफीचं सेवन सुरू करते. चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन असतं. ज्याच्या जास्त सेवनाने शरीरातील पाणी कमी होतं आणि मग मलत्याग करण्यासाठी समस्या होते. अशात चहा आणि कॉफीचं सेवन कमी करा.

बेकरी प्रोडक्ट्स टाळा

बेकरीमध्ये तयार प्रोडक्ट्स जसे की, केक, पेस्ट्री, ब्रेड हे पदार्थ पचायला खूप वेळ लागतो. यामुळए पोटाच्या पचन तंत्रावर प्रभाव पडतो आणि शरीराचं मेटाबॉलिज्मही प्रभावित होतं. जर तुम्ही रोज हे पदार्थ खात असाल तर याने तुम्हाला पाइल्स व्हायला काहीच वेळ लागणार नाही.

या भाज्या टाळा

अशा अनेक भाज्या आहेत ज्यांच्या सेवनाने गॅस-अॅसिडिटी, अपचन आणि ढेकर अशा समस्या होतात. यात शिमला मिरची, फ्लॉवर, बटाटे, पत्ताकोबीसारख्या भाज्यांचा समावेश आहे. या भाज्या नेहमीच खाल्ल्या तर पचन तंत्र कमजोर होतं. ज्यामुळे पाइल्सची समस्या होते.

भाजलेले-तळलेले पदार्थ

जास्त मसालेदार आणि तळलेले-भाजलेले पदार्थ आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. यामुळे शरीरात फॅट वाढतं, सोबतच ते सहजपणे पचतही नाहीत. या पदार्थांमुळे बद्धकोष्ठतेची समस्या सुरू होते, जी पुढे जाऊ पाइल्सचं रूप घेते. जर या आजारापासून बचाव करायचा असेल तर तळलेले-भाजलेले पदार्थ खाणं टाळा.

Web Title: Causes of piles and its control home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.