थंडीत हातापायांना सुज येते का? जाणून घ्या त्यावरील घरगुती उपाय...सहज आणि सोपे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 06:39 PM2022-02-10T18:39:21+5:302022-02-10T18:41:32+5:30
काही प्रभावी घरगुती उपायांच्या (Home Remedies) मदतीने तुम्ही शरीरातील सूज लवकर कमी करू शकता. मात्र, अधिक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. शरीरात सूज येण्याची अनेक (Home Remedies For Swelling) कारणं असू शकतात.
हिवाळ्यात प्रचंड थंडीमुळं काही लोकांना शरीरावर सूज येण्याची (Body Swelling) समस्या होऊ शकते. शरीरात जळजळ होण्याची किंवा सूज येण्याची अनेक कारणं असू शकतात. अंगावर सूज आल्यानं लोक घाबरतात. मात्र, हा काही मोठा आजार नाही. हे किरकोळ आजाराचं लक्षणही असू शकतं. काही प्रभावी घरगुती उपायांच्या (Home Remedies) मदतीने तुम्ही शरीरातील सूज लवकर कमी करू शकता. मात्र, अधिक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. शरीरात सूज येण्याची अनेक (Home Remedies For Swelling) कारणं असू शकतात.
हृदयविकार, मूत्रपिंड समस्या (Kidney Problem), शरीरातील विविध स्रावांचं असंतुलन (Hormonal Imbalance) आणि स्टिरॉइड औषधांचा वापर यामुळं दाह होणं किंवा सूज येण्याची समस्या होऊ शकते. काही महिलांमध्ये मासिक पाळीच्या एक आठवडा आधी सूज येण्याची समस्या दिसून येते. याशिवाय, खराब जीवनशैली आणि आरोग्याला हानिकारक आहारामुळं सूज येण्याची समस्या होऊ शकते. सूज दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊ.
सूज दूर करण्यासाठी घरगुती उपाय
तुळस
तुळशीच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचं सेवन केल्यास शरीरातील जळजळ, सूज दूर होण्यास मदत होते. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. थंडीच्या मोसमात तुळशीचं सेवन केल्यानं सर्दी-पडशाला दूर ठेवता येतं.
हळद
हळदीमध्ये अनेक अँटीसेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळं जळजळ कमी होण्यास मदत होते. सूज दूर करण्यासाठी आहारात हळदीचा अवश्य समावेश करावा. तुम्ही हिवाळ्यात कच्च्या हळदीचंही सेवन करू शकता. झोपण्यापूर्वी तुम्ही हळद घालून दूधही पिऊ शकता.
जिरे
शरीराची सूज कमी करण्यासाठी जिरे आणि साखर समान प्रमाणात बारीक करून एक चमचा दिवसातून तीन वेळा खाल्ल्यास सूज सहजपणे दूर होते. जिरे पोटाच्या समस्याही दूर करण्यास देखील मदत करतात.
ग्रीन टी
ग्रीन टी हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. ग्रीन टी आणि मधाचं सेवन करून जळजळ होण्याची समस्या दूर करता येते. याशिवाय, ग्रीन टी प्यायल्यानं वजन नियंत्रणात ठेवणंही सोपं जातं.