पोट फुगल्याप्रमाणे आणि जड वाटतंय?; तर पॅनक्रियाटिक कॅन्सरचा असू शकतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 10:16 AM2020-05-22T10:16:00+5:302020-05-22T10:16:15+5:30

पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी एंजाइम्सचं उत्पादन याद्वारे केलं जातं. शरीराला कार्बोहायड्रेटस आणि प्रोटीन्सची आवश्यकता असते.

Causes, symptoms and prevention of pancreatic cancer myb | पोट फुगल्याप्रमाणे आणि जड वाटतंय?; तर पॅनक्रियाटिक कॅन्सरचा असू शकतो धोका

पोट फुगल्याप्रमाणे आणि जड वाटतंय?; तर पॅनक्रियाटिक कॅन्सरचा असू शकतो धोका

googlenewsNext

कॅन्सरचा आजार गंभीर आणि जीवघेणा असून वेगवेगळ्या प्रकारे या आजाराचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. अनेकदा पोटाच्या समस्या रोजच्याच असल्यामुळे आपण जास्त लक्ष देत नाही. पण पोट जास्त जड झाल्यासारखं वाटणं, पोट फुगणं ही लक्षणं पॅनक्रियाटीक कॅन्सरची सुद्धा असू शकतात. सुरुवातीला या आजाराच्या लक्षणांना ओळखणं खूप कठिण असतं. कारण सामान्य पोटाच्या समस्यांप्रमाणे ही लक्षणं असतात. पॅनक्रियाचा कॅन्सर हा पॅनक्रियामध्ये असलेल्या टिश्यूच्या आत होतो.

पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी एंजाइम्सचं उत्पादन याद्वारे केलं जातं. शरीराला कार्बोहायड्रेटस आणि प्रोटीन्सची आवश्यकता असते. पॅनक्रिया शरीरात दोन प्रकारे हार्मोन्स तयार करतात. ग्लूकॅगोन आणि इंसुलिन यामुळे पचनक्रिया व्यवस्थित व नियंत्रणात राहते. ग्लूकॅगोन शरीरातलील ग्लूकोजचा स्तर वाढवून आपली मदत करतात. पॅनक्रियात असामान्य पेशींची वाढ झाल्यानंतर हा आजार होतो. कारण त्यामुळे ट्यूमर तयार होतो.

लक्षणं

भूक कमी होणं

अचानक वजन कमी होणं

पोटाच्या खालच्या बाजूला वेदना होणं

उल्टी होणं

सूज येणं

पित्त वाढणं

थकवा येणं

रक्त गोठणं

ताण-तणाव

उपाय

धुम्रपान  करू नका

जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर पॅनक्रियाचा कॅन्सर नाही तर इतर अनेक प्रकारच्या आजारांचे शिकार होऊ शकता. जर तुम्हाला कॅन्सरमुक्त राहायचं असेल तर अशा पदार्थांचे सेवन करू नका. त्यासोबतच जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे शरीरासाठी नुकसानकराक ठरू शकतं. 

वजनावर नियंत्रण ठेवा

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत अनेक आजार हे लठ्ठपणामुळे उद्भवतात. कारण बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या वेळेतील अनियमीतता यामुळे वजन वाढतं. काही केल्या वाढलेलं वजन कमी होत नाही. मग आजारांचा  सामना करावा लागतो.  त्यासाठी संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. 

सेरोलॉजिकल टेस्ट म्हणजे काय? माहीत करून घ्या कोरोना विषाणूंच्या तपासणीची ही पद्धत

धमन्यांमध्ये वाढलेलं कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी इफेक्टिव्ह ठरेल कांदा, 'असा' करा वापर 

Web Title: Causes, symptoms and prevention of pancreatic cancer myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.