कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये 'ब्रेन फॉग'चा धोका, नव्या संशोधनातून धक्कादायक बाबी उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 03:51 PM2021-10-25T15:51:03+5:302021-10-25T15:51:18+5:30

जर तुम्ही अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टी विसरत असाल किंवा तुम्हाला तुम्हीच बोलले स्वतःचे शब्दही लक्षात ठेवणं कठीण जात असेल तर त्याला 'ब्रेन फॉग' (Brain fog) असे म्हणतात.

causes symptoms remedies of brain fog | कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये 'ब्रेन फॉग'चा धोका, नव्या संशोधनातून धक्कादायक बाबी उघड

कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये 'ब्रेन फॉग'चा धोका, नव्या संशोधनातून धक्कादायक बाबी उघड

googlenewsNext

जर तुम्ही अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टी विसरत असाल किंवा तुम्हाला तुम्हीच बोलले स्वतःचे शब्दही लक्षात ठेवणं कठीण जात असेल तर त्याला 'ब्रेन फॉग' (Brain fog) असे म्हणतात. ही वैद्यकीय संज्ञा नाही. सामान्यपणे या आजाराची अशी व्याख्या केली जाते. मेंदूशी संबंधित समस्यांचा ग्रुपला 'ब्रेन फॉग' म्हटले जाते. ज्यात स्मरणशक्ती कमी होणे, कामात लक्ष न लागणे, माहिती समजण्यात अडचण, थकवा आणि विविध प्रकारचे विचार डोक्यात येणं इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. ही लक्षणे इतर अनेक संभाव्य आजारांमध्येही दिसून येतात. उदाहरणार्थ, कर्करोग आणि त्यात दिलेली केमोथेरपी, नैराश्य, क्रॉनिक फॅटीग सिंड्रोम. ब्रेन फॉगची समस्या गर्भधारणेदरम्यान देखील होऊ शकते.

एका संशोधनानुसार, कोरोनापासून बरे झालेल्या सुमारे २८ टक्के लोकांनी ब्रेन फॉग, मूड बदलणे, थकवा आणि एकाग्रतेचा अभाव असल्याची तक्रार केली आहे.

ब्रेन फॉगची लक्षणे काय आहेत?
दिल्लीच्या उजाला सिग्नस हॉस्पिटलचे संचालक डॉ. शुचिन बजाज यांनी न्यु १८ हिंदिला दिलेल्या बातमीत सांगितले आहे की, ब्रेन फॉगमुळे व्यक्तीच्या वागण्यात झपाट्याने बदल होतो. अशा लोकांमध्ये नेहमी थकवा, कोणत्याही कामात मन न लागणे, चिडचिड, नैराश्य, त्यांच्या आवडीच्या कामात रस नसणे, सतत डोकेदुखी, झोप नीट न येणे आणि छोट्या छोट्या गोष्टी विसरणे अशी लक्षणे असतात. रक्त तपासणीत डॉक्टर ते शोधू शकतात. जसे की साखर किंवा थायरॉईडचे असंतुलन, मूत्रपिंडाचे (किडनी) खराब कार्य इत्यादी, किंवा कोणताही संसर्ग होणे किंवा शरीरात पोषक घटकांची कमतरता देखील ब्रेन फॉगचे कारण असू शकते.

Web Title: causes symptoms remedies of brain fog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.