कोरोना, डेंग्यू पाठोपाठ आता स्क्रब टायफसचा धोका, वेळीच लक्षणं जाणून घ्या नाहीतर ओढावेल मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 03:12 PM2021-09-03T15:12:16+5:302021-09-03T15:43:03+5:30

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम उत्तरप्रदेशात स्क्रब टायफस (Scrub Typhus) या रहस्यमयी रोगाची दहशत निर्माण झाली आहे. तिसऱ्या लाटेचं वादळ घोंगावत असतानाच या स्क्रब टायफसनं डोकं वर काढलंय.

causes symptoms remedies of scrub typhus after corona danger of scrub typhus | कोरोना, डेंग्यू पाठोपाठ आता स्क्रब टायफसचा धोका, वेळीच लक्षणं जाणून घ्या नाहीतर ओढावेल मृत्यू

कोरोना, डेंग्यू पाठोपाठ आता स्क्रब टायफसचा धोका, वेळीच लक्षणं जाणून घ्या नाहीतर ओढावेल मृत्यू

googlenewsNext

कोरोना, डेंग्यूपाठोपाठ आता स्क्रब टायफसनं डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम उत्तरप्रदेशात स्क्रब टायफस (Scrub Typhus) या रहस्यमयी रोगाची दहशत निर्माण झाली आहे. तिसऱ्या लाटेचं वादळ घोंगावत असतानाच या स्क्रब टायफसनं डोकं वर काढलंय.

काय आहे स्क्रब टायफस?
स्क्रब टायफस हा रोग सुटसुगमुशी नावाच्या जीवाणुमुळे होतो. संक्रमित कीटक चावल्याने स्क्रब टायफसचा प्रसार होतो. या रोगाची लक्षणे साधारण चिकनगुनियाच्या आजारासारखी असतात. मात्र, स्क्रब टायफस अधिक घातक असल्यामुळे रुग्णाचा मृत्यू ओढावण्याची शक्यता जास्त असते. या रोगापासून वाचवण्यासाठी कपडे आणि अंथरूणावर परमेथ्रिन आणि बेंझिल बेंझोलेट शिंपडावे.


स्क्रब टायफसची लक्षणे काय?
स्क्रब टायफसच्या प्रमुख लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी आणि अंगदुखीचा समावेश आहे. तसेच रोगाची लागण झाल्यास तुमच्या अंगावर काळे चट्टे उठतात. अनेकांच्या अंगावर सूज येण्याचीही शक्यता आहे.

स्क्रब टायफसवर उपाय काय?
स्क्रब टायफस या रोगावर कोणतीही लस उपलब्ध नाही. केवळ संक्रमित व्यक्तीपासून दूर राहणे, हा एकमेव बचावाचा मार्ग आहे. त्यामुळे या रोगाचे संक्रमण झाल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत गरजेचे आहे.

Web Title: causes symptoms remedies of scrub typhus after corona danger of scrub typhus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.