झोप न लागण्याची कारणे अनेक पण दुष्परिणाम अतिगंभीर, 'हे' उपाय केल्यास लागेल शांत झोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 14:30 IST2021-08-27T13:04:32+5:302021-08-27T14:30:18+5:30
जर तुम्हाला रात्रभर नीट झोप लागली नाही तर दुस-या दिवशी अस्वस्थ वाटते. झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात. झोपमोड झाल्यास अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

झोप न लागण्याची कारणे अनेक पण दुष्परिणाम अतिगंभीर, 'हे' उपाय केल्यास लागेल शांत झोप
जर तुम्हाला रात्रभर नीट झोप लागली नाही तर दुस-या दिवशी अस्वस्थ वाटते. कमी झोपेमुळे तुमचेे डोके जड होते व संपुर्ण दिवस कंटाळवाणा जातो. रात्री झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात. उदा.दुस-या दिवशी महत्वाची मिटींग असणे, क्रेडीट कार्डचे भरमसाठ बिल येणे, वैवाहिक जीवनातील समस्या, वेळेअभावी दुर्लक्षित झालेली कामे अशी झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात. झोपमोड झाल्यास अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
झोप न लागण्याची कारणे
- हार्टबर्न-यासाठी जड पदार्थ खाणे टाळा. ह्रदयात जळजळ होत असल्यास शरीराचा वरच्या भागाखाली उशी घ्या. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
- मधूमेह-रात्री अंगाला घाम येणे, वारंवार लघवीला होणे, पाय दुखणे, रक्तात साखरेचे प्रमाण कमी असणे या मधूमेहातील समस्येमुळे रात्री कमी झोप लागते.
- Obstructive sleep apnea या समस्येमध्ये टॉन्सिल्सची वाढ अथवा घशातील मांसल भागात वाढ झाल्याने श्वसनसमस्या निर्माण होतात.यामध्ये घोरणे, थकवा, कमी झोप, लक्ष देणे अथवा एकाग्र करणे यामध्ये समस्या होणे ही लक्षणे आढळतात.
- Nocturia अथवा लघवीची समस्या- या विकारात लघवीसाठी वारंवार उठावे लागते. वयस्कर लोकांमध्ये हार्टफेल, मधूमेह, मूत्रमार्गातील इनफेक्शन, यकृताच्या समस्या,यामध्ये घेण्या-या औषधांमुळे त्या रुग्णांना, तसेच ड्रग्ज घेणारे लोक अशा लोकांना ही समस्या अधिक जाणवते.कार्डिओ व्हॅस्क्यूलर डिसिस, आर्थ्राटीस, किडनी विकार, मनोविकार, श्वसनाच्या समस्या, थायरॉईड या आरोग्य समस्या असलेलेल रुग्णांना झोप कमी लागते. काही ओव्हर-दी-काउंटर औषधे व उपचारांनी ही समस्या दूर करता येते.
झोप येण्यासाठीचे उपाय
वेळापत्रक तयार करा:तुम्हाला किती वाजता तुमचे कार्य सुरू करायचे आणि कधीपर्यंत ते पूर्ण करायचे आहे, याचे नियोजन करा. या वेळापत्रकामध्ये सकाळी उठल्यानंतरची कामे ते रात्री झोपण्यापूर्वी कोणती कामे करायची आहेत, अशा प्रकारे सर्व माहिती नोंद करावी. यामुळे तुम्हाला स्वतःसाठी किती वेळ मिळणार आहे आणि त्यानंतर किती वेळानं झोपायचे आहे, याची स्पष्ट कल्पना तुम्हाला येईल. काही दिवस वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन केल्यास तुम्हाला आपोआपच वेळेत झोप येईल.
रात्री उशीरापर्यंत मोबाईलचा वापर टाळा : काही जण रात्री उशिरापर्यंत मोबाइल वापरत असतात. ही अतिशय वाईट सवय आहे. कारण या सवयीमुळे तुमच्या झोपेवर दुष्परिणाम होत आहेत. काही जण मोबाइलवर गेम खेळत असतात किंवा एखादा सिनेमा/वेब सीरिज पाहत असतात. उशिरा रात्रीपर्यंत तुम्हाला झोप न येण्यामागील हे देखील मुख्य कारण असू शकते. यामुळे झोपण्यापूर्वी शक्यतो मोबाइल दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.
दीर्घ श्वास घ्या: अंथरुणात पडल्यानंतरही तुम्हाला झोप येत नसल्यास सुरुवातीस मन शांत करा आणि दीर्घ श्वास घ्या. आपले लक्ष श्वासांवर केंद्रीत करण्याचा प्रयत्न करा. दीर्घ पण शांत स्वरुपात श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुरू राहू द्या. यामुळे तुमच्या मनाची एकाग्रता वाढण्यास मदत होईल. शारीरिक तसंच मानसिक ताण कमी होईल. यामुळे तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत मिळेल.