पालकांनो सावधान! लहान मुलांची बौद्धिक क्षमता कमी होण्याचं हे असू शकतं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 10:53 AM2018-10-17T10:53:13+5:302018-10-17T11:21:05+5:30

भारतीय लहान मुलांच्या रक्तात शिसं अधिक प्रमाणात असल्याने त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर वाईट प्रभाव होऊ शकतो. याच कारणाने वेगवेगळ्या आजारांचीही समस्या होऊ शकते.

Causes of a weak memory of kids reveals in research | पालकांनो सावधान! लहान मुलांची बौद्धिक क्षमता कमी होण्याचं हे असू शकतं कारण!

पालकांनो सावधान! लहान मुलांची बौद्धिक क्षमता कमी होण्याचं हे असू शकतं कारण!

Next

भारतीय लहान मुलांच्या रक्तात शिसं अधिक प्रमाणात असल्याने त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर वाईट प्रभाव होऊ शकतो. याच कारणाने वेगवेगळ्या आजारांचीही समस्या होऊ शकते. एका नव्या शोधातून ही बाब समोर आली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मॅकक्वेरी विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी भारतीयांच्या रक्तातील शिशाचं प्रमाण याबाबत पहिलं मोठं विश्लेषण केलं आहे. या विश्लेषणातून आढळलं की, आजारांचा धोका आधीच्या तुलनेत अधिक वाढला आहे. याचा लहान मुलांच्या बौद्धिक क्षमतेवर नकारात्मक प्रभाव पडतो. 

मॅकक्वेरी विश्वविद्यालयाचे ब्रेट एरिक्सन म्हणाले की, भारतात राहणाऱ्या लहान मुलांच्या बौद्धिक क्षमतेवर होणारा दुष्परिणाम गंभीर आहे. त्यांच्या रक्तात शिशाच्या मिश्रणाचं प्रमाण साधारण ७ मायक्रो ग्रॅम प्रति डेसीलिटर आहे. अभ्यासकांनी सांगितले की, भारतीयांच्या रक्तात शिशाचं प्रमाण वाढण्याचं कारण बॅटरी रिसायकल क्रिया आहे. भारतात बॅटरी रिसायकल प्रक्रियेची व्यवस्था फार वाईट आहे.   

एरिक्सन म्हणाले की, 'भारतात मोठ्या प्रमाणात लोक मोटरसायकल किंवा कार चालवतात. या वाहनांच्या बॅटरीचं लाइफ हे केवळ दोन वर्ष असतं. लेड बॅटरींचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. या बॅटरी दरवर्षी रिसायकल केल्या जातात. पण त्या योग्य पद्धतीने रिसायकल केल्या जात नाही'.

अभ्यासकांनी सांगितले की, आयुर्वेदिक औषधी, आयलायनर, नूडल्स आणि मसालेसहीत अनेक आणखीही काही पदार्थ आहेत जे लहान मुलांच्या रक्तात शिशाचं प्रमाण वाढवतात. 

२०१० ते २०१८ दरम्याने करण्यात आलेल्या पाहणीनुसार रक्तात शिशाचं प्रमाण वाढलं हे दाखवणाऱ्या आकडेवारीने बौद्धिक क्षमतेत कमतरता आणि रोगांचं कारण असलेल्या डिसेबिलिटी अडजस्टेड लाइफ इअर्स(डीएएलवाय) ची माहिती मिळाली. डीएएलवायने हे माहिती पडतं की, आजारांमुळे, क्षमता कमी झाल्याने आणि अवेळी आलेल्या मृत्यूने आपण किती वर्ष गमावली आहेत. 

शिशाने प्रेरित डीएएलवायमुळे ४६ लाख लोक प्रभावित झाले आणि १६५,००० लोकांचा मृत्यू झाला. आता नव्या अभ्यासातून हे समोर आलं आहे की, डीएएलवायची संख्या वाढून ४९ लाख होऊ शकते. 

Web Title: Causes of a weak memory of kids reveals in research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.