लॉकडाऊनमध्ये उंदरांमुळे माणसांना असू शकतो संक्रमणाचा धोका; तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 05:33 PM2020-05-26T17:33:43+5:302020-05-26T18:00:43+5:30

उंदरांमध्ये होत असलेल्या बदलांमध्ये त्यांना जेवण न मिळणं हे सगळ्यात मोठं कारण आहे.

Cdc warns of aggressive cannibal rats facing shortage of garbage to eat myb | लॉकडाऊनमध्ये उंदरांमुळे माणसांना असू शकतो संक्रमणाचा धोका; तज्ज्ञांचा दावा

लॉकडाऊनमध्ये उंदरांमुळे माणसांना असू शकतो संक्रमणाचा धोका; तज्ज्ञांचा दावा

Next

कोरोना विषाणूंमुळे जगभरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कोरोना व्हायरसमधून बरे होत असलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी मृतांचा आकडा सुद्धा दिवसेंदिवस वाढत जात आहे. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी जगभरातील सर्वच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊनचा परिणाम माणसांवर होत आहे. त्याचप्रमाणे प्राण्यावर सुद्धा होत आहे. अमेरिकेतील सीडीसी (Centers for Disease Control and Prevention)ने  उंदराबाबत धोक्याची सुचना दिली आहे. 

उंदरांमध्ये होत असलेल्या बदलांमध्ये त्यांना जेवण न मिळणं हे सगळ्यात मोठं कारण आहे. उंदरं  कोणत्याही हॉटेलमधील उरलेलं अन्न, रस्त्यावर पडलेला कचरा खाऊन आपली भूक भागवतात. पण सध्या लॉकडाऊनमुळे उंदरांना भूकमारीचं शिकार व्हावं लागत आहे. अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर उंदरं आपली भूक भागवण्यासाठी एकमेकांना खात होते. सीडीसीने हा मुद्दा लक्षात घेत सुचना दिल्या आहेत. 

सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार,  लॉकडाऊनमुळे अनेक लहान जीवांना खायला अन्न मिळत नाही. काही ठिकाणच्या रिपोर्टनुसार या प्राण्यांनी लॉकडाऊन दरम्यान आपल्या खाण्याचा नवीन स्त्रोत शोधला आहे. पर्यावरणाप्रती वाढलेली आक्रमकता या प्राण्यांमध्ये दिसून आली. न्यूयॉर्कमध्ये उंदरांमध्ये आक्रमकता वाढली आहे. तेच ऑर्लेअंसमध्ये सीसीटीव्हीमध्ये उंदरांची असामान्य लक्षणं कैद झाली आहेत.

स्ट्रीट टूर गाइड चार्ल्स मार्सला ने सीबीएस न्यूज ला दिलेल्या माहितीनुसार,  त्यांनी ३० उंदरांना रस्त्यावर काहीतरी खाताना पाहिलं. शिकागोमध्ये ही अशीच स्थिती होती. खाण्याच्या शोधात उंदरं घरांमध्ये शिरून संक्रमण पसरवत होते. तज्ज्ञांच्यामते येत्या काळात उंदरामधील आक्रमकता वाढू शकते. 

रोडेंटोलॉजिस्ट बॉबी कोरिगन यांनी वॉश्गिंटन पोस्टला सांगितले की, आमच्या शहरातील  उंदरं  हॉटेल्स, रेस्टॉरटंचं आणि अन्य दुकांनामधून मिळत असलेल्या रात्रीच्या अन्नावर अवलंबून असतात. आपत्तीजन्य काळात लहान जनावरांच्या संख्येत वाढ होणं. ही सामन्य गोष्ट असल्याचे सीडीसीने सांगितले. तसंच सीडीसीने दिलेल्या सुचनेनुसार आक्रमक उंदरांपासून वाचण्यासाठी दुकांनानी एंट्री पॉईंट्स बंद करणं, कचरा बंद झाकणाच्या डब्ब्यात टाकणं,  घराच्या आसपासच्या परीसरात प्राण्याचे खाद्यपदार्थ नसणं याची काळजी घेणं आवश्यक आहे. 

कोरोना विषाणूंबाबत WHO ने दिली धोक्याची सूचना; जगभरातील देशांच्या चिंतेत वाढ

जेवल्यानंतर तुम्हालाही गॅस पास होण्याची समस्या उद्भवते? 'या' उपायांनी करा कंट्रोल 

Web Title: Cdc warns of aggressive cannibal rats facing shortage of garbage to eat myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.