काळजी वाढली! कांद्यामुळे पसरतंय 'या' बॅक्टेरियाचं संक्रमण; CDC नं सांगितली लक्षणं, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 06:12 PM2020-08-06T18:12:57+5:302020-08-06T18:16:45+5:30

अमेरिकेतील सगळ्यात मोठी आरोग्य संस्था सीडीसीने बॅक्टेरियांच्या संक्रमणाबाबत सुचना दिली आहे. 

CDC warns of mysterious salmonella outbreak spreading through onion in usa and canada | काळजी वाढली! कांद्यामुळे पसरतंय 'या' बॅक्टेरियाचं संक्रमण; CDC नं सांगितली लक्षणं, जाणून घ्या

काळजी वाढली! कांद्यामुळे पसरतंय 'या' बॅक्टेरियाचं संक्रमण; CDC नं सांगितली लक्षणं, जाणून घ्या

Next

कोरोनाच्या माहामारीशी संपूर्ण देश लढत आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कोरोनाच्या संक्रमणामुळे जगभरातील लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच एका नवीन बॅक्टेरियांच्या प्रसाराबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. हे संक्रमण सॅल्मोनेला नावाच्या बॅक्टेरियामार्फत पसरतं. कोरोनामुळे अमेरिकेत सर्वाधिक लोक संक्रमित आहेत.  अशात अमेरिकेत ३४ राज्यांमध्ये ४०० लोकांपर्यंत हे संक्रमण पोहोचलं आहे. कॅनडामध्ये ५० पेक्षा जास्त लोकांना रुग्णालयात भरती व्हावं लागलं आहे. अमेरिकेतील सगळ्यात मोठी आरोग्य संस्था सीडीसीने बॅक्टेरियांच्या संक्रमणाबाबत सुचना दिली आहे. 

अमेरिकेत लाल आणि पिवळ्या कांद्याच्या माध्यमातून सॅल्मोनेला बॅक्टेरियाचं संक्रमण पसरल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ३४ राज्यामधील ४०० पेक्षा जास्त लोकांना कोरोना विषाणूंचे संक्रमण झालं आहे. सीडीसीने  लोकांना कांदा न खाण्यासाठी गाईडलाईन्स दिल्या आहेत. ज्याच्या घरात आधीपासूनच कांदे आहेत त्यांना फेकून देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

सीएनएनच्या रिपोर्टनुसार कॅनडामध्ये सॅल्मोनेला बॅक्टेरियाच्या संक्रमणाचे रुग्ण आढळून आले आहेत. या बॅक्टेरियांनी संक्रमित झाल्यामुळे ६० लोकांना रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली आहे. कांदा खाल्याने होत असलेल्या या संक्रमणाबाबत लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. 

प्रतीकात्मक तस्वीर

अमेरिकी फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (FDA) ने दिलेल्या माहितीनुसार ३४ राज्यांमध्ये  पसरलेल्या सॅल्मोनेला बॅक्टेरियाचे मुळ लाल  रंगाच्या कांद्यात आहे. सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार  १९ जून ते ११ जुलै यादरम्यान हे संक्रमण वाढत गेलं आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पुरवठादार संस्था थॉमसन इंटरनॅशनलकडून लाल, पांढरा, पिवळा आणि गोड कांदा परत मागवण्यात आला आहे.

लक्षणं

सॅल्मोनेला  बॅक्टेरीयाच्या संक्रमणाची अतिसार, पोटदुखी, ताप येणं ही लक्षणं सीडीसीने सांगितली आहेत. ६ तासांपासून ६ दिवसांपर्यंत लक्षणांची तीव्रता दिसू शकते. सॅल्मोनेला बॅक्टेरियांचे गंभीर संक्रमण झाल्यास आतड्यांचे नुकसान होऊ शकते.  ५ वर्षांपासून ते ६५ वर्ष वयोगटात हे संक्रमण पसरू शकतं. अशी माहिती सीडीसीतील तज्ज्ञांनी दिली आहे. 

खरंच तुमच्या मास्कने कोरोना संसर्गापासून होतोय बचाव? घरच्याघरी 'ही' ट्रिक वापरून तपासा

आनंदाची बातमी! भारतात लॉन्च झालं कोरोनाचं औषधं 'कोविहॉल्ट'; ४९ रुपयांत रुग्णांसाठी उपलब्ध होणार

Web Title: CDC warns of mysterious salmonella outbreak spreading through onion in usa and canada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.