पोटावरील चरबीमुळे शरीरात होतात अनेक आजार, या 5 टिप्स वापरून कमी करू शकता पोट...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 01:51 PM2022-08-05T13:51:48+5:302022-08-05T13:52:14+5:30

Weight Loss Tips : जर्नल ऑफ ऑस्टिओपॅथिक मेडिसीननुसार, पुरूषांमध्ये 40 इंच आणि महिलांमध्ये 35 इंचपेक्षा अधिक कंबरेच्यावर असलेल्या मांसाला लठ्ठपणा म्हटला जातो.

Certified dietitian shared 5 tips for flat stomach common weight loss goal | पोटावरील चरबीमुळे शरीरात होतात अनेक आजार, या 5 टिप्स वापरून कमी करू शकता पोट...

पोटावरील चरबीमुळे शरीरात होतात अनेक आजार, या 5 टिप्स वापरून कमी करू शकता पोट...

Next

Weight Loss Tips : पोटावरील चरबी कमी करणं वजन कमी करण्याच्या मुख्य लक्ष्यांपैकी एक असतं. पोटावरील चरबी जमा झाल्याने केवळ शरीर बेढब दिसतं असं नाही तर शरीरात अनेक आजार तयार होतात. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, पोटात जमा होणारं फॅट टाइप 2 डायबिटीस आणि हृदयरोगसारख्या गंभीर आजारांचं कारण ठरतं. 

जर्नल ऑफ ऑस्टिओपॅथिक मेडिसीननुसार, पुरूषांमध्ये 40 इंच आणि महिलांमध्ये 35 इंचपेक्षा अधिक कंबरेच्यावर असलेल्या मांसाला लठ्ठपणा म्हटला जातो. अशात जीवनशैली आणि खाणं-पिण्यात बदल करून पटावरील चरबी कमी केली जाऊ शकते.

सर्टिफाइड डायटिशिअन आणि न्यूट्रिनिस्ट निकित तनवर यांनी पोटावरील चरबी करण्याबाबत नुकत्याच काही टिप्स शेअर केल्या आहेत. त्यांनी आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलं आहे की, जर तुम्हाला तुमच्या कंरबेच्या जवळची चरबी कमी करायची असेल तर या टिप्स खूप कामी येतील.

कोर मसल्स मजबूत करण्यासाठी एक्सरसाइज करा

कोर मांसपेशी पोटाच्या आजूबाजूला असतात. यात पोटाच्या मांसपेशी आणि पाठीच्या मांसपेसी दोन्हींचा समावेश असतो. एका मजबूत कोर कार्डिओ आणि इतर हालचाली दरम्यान शरीरावर जखम होण्यापासून वाचवण्यासाठी सपोर्टचं काम करतं. जेव्हा एखादी व्यक्ती पोटावरील चरबी कमी करतो तेव्हा कोर मांसेपशीचं निर्माण पोट दिसणं आणि टोन्ड होण्यास मदत करतं. 

नियमितपणे करा कॅलरीचं सेवन

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर दिवसेंदिवसच्या आहारात 500 ते 1 हजार कॅलरीचं सेवन कमी करा. कॅलरी शरीरातून पूर्णपणे कमी करू नका. असं केलं तर वजन कमी करण्याचा प्लानिंग पूर्णपणे बिघडू शकतं. हे महत्वाचं आहे की, कॅलरीचं सेवन फार जास्त किंवा जास्त काळासाठी कमी करू नका.

प्रोटीनयुक्त आहार फायदेशीर

हाय प्रोटीन आहार तुमच्यासाठी मेटाबॉलिज्म बूस्ट करण्याचं काम करतं. याने भूक कमी लागते आणि वेट लॉस दरम्यान मांसपेशी कायम ठेवण्यास मदत करतं. अशात प्रोटीनयुक्त आहाराचं योग्य प्रमाणात सेवन करा. 

फक्त डाएटच नाही तर अॅक्टिवही रहा

दररोज व्यायाम करा. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात करा. त्यासोबतच आवश्यक तो आहार घ्या.  अशा एक्सराइज करा ज्याने जास्तीत जास्त कॅलरी बर्न होतील.

Web Title: Certified dietitian shared 5 tips for flat stomach common weight loss goal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.