आदार पूनावाला म्हणतात, भारतात 'एवढ्या' रुपयांत मिळणार कोरोना लस; जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 04:08 PM2020-07-22T16:08:50+5:302020-07-22T16:14:39+5:30

CoronaVirus News: संपूर्ण देश कोरोनाशी लढत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लसीची किंमत कमी ठेवण्यात येणार आहे.

Cerum institute of india ceo adar poonawalla says covid 19 vaccine to cost rs 1000 per dose | आदार पूनावाला म्हणतात, भारतात 'एवढ्या' रुपयांत मिळणार कोरोना लस; जाणून घ्या किंमत

आदार पूनावाला म्हणतात, भारतात 'एवढ्या' रुपयांत मिळणार कोरोना लस; जाणून घ्या किंमत

Next

भारतात आता ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीचे उत्पादन केले जाणार आहे. पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट याचे उत्पादन करणार आहे. यावर पुनावाला यांनी मोठा खुलासा केला आहे. कोरोनावरील ही लस या वर्षाच्या शेवटी येणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर सीरमचे सीईओ आदार पुनावाला यांनी मोठा खुलासा केला आहे. टुडे नेटवर्कला आज ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लस प्रकल्पाचे संचालक अँड्र्यू जे पोलार्ड आणि पुनावाला यांची मुलाखत घेण्यात आली.

यावेळी पुनावाला यांनी दिलासा देणारी माहिती दिली आहे. पोलार्ड यांनी सांगितले की, अँटीबॉडी रिस्पॉन्सवरून समजते की, ही लस खूप उपायकारक आहे. चाचण्यांमध्ये हे समोर आले आहे. मात्र, आम्हाला ही लस कोरोना व्हारसपासून वाचवू शकते याचे पुरावे हवे आहेत. या लसीची चाचणी वेगवेगळ्या लोकांवर केली जाणार आहे. याचा अभ्यास केला जाईल, त्याचे दुसऱ्या लोकांवरील परिणाम पाहिले जातील.

पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India CEO Adar Poonawalla)  अदार पुनावाला यांनी सांगितले की संपूर्ण देश कोरोनाशी लढत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लसीची किंमत कमी ठेवण्यात येणार आहे. भारतात कोरोना लसीची किंमत १००० रुपये किंवा त्यांपेक्षा कमी असेल.

माध्यामांना दिलेल्या माहितीत ते म्हणाले की, संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे लसीची मागणी ही मोठ्या प्रमाणावर असेल. अशा स्थितीत उत्पादन आणि वितरणासाठी सरकारी यंत्रणांची आवश्यकता भासू शकते. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीद्वारे विकसित करण्यात आलेली  कोरोनाची ही लस तयार करण्यासाठी बायोफर्मासिटिकल कंपनीने AstraZeneca शी भागिदारी केली आहे.

पुनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार कोविड 19 च्या लसीच्या चाचणीची सुरूवात ऑगस्टच्या शेवटापर्यंत होऊ शकते. ५००० भारतीय स्वयंसेवकांवर लसीचे परिक्षण केले जाणार आहे. योग्य परिणाम दिसून आल्यानंतर पुढच्या वर्षी जूनमध्ये ही लस विकसीत केली जाणार आहे. मोठ्या स्तरावर या लसीचे उत्पादन केले जाणार आहे.  या आठवड्यात या लसीच्या निर्मीतीसाठी मंजूरी मिळणार आहे.  डिसेंबरपर्यंत ३० ते ४० कोटी डोस तयार करता येतील. 

आता कोरोना चाचणी २० मिनिटात होणार; 'या' चाचणीने कमी होईल संक्रमणाचा वेग, तज्ज्ञांचा दावा

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे मेंदूवर 'असा' होतोय परिणाम; तज्ज्ञांनी सांगितली नवी लक्षणं

Web Title: Cerum institute of india ceo adar poonawalla says covid 19 vaccine to cost rs 1000 per dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.