या डाळीच्या सेवनाने वाढेल शरीरात रक्त, दूर होईल एनीमिया आजाराचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 01:27 PM2022-11-22T13:27:28+5:302022-11-22T13:27:58+5:30
Iron Rich Food: एनीमियामुळे शरीरात आयरनची कमतरता होते. ते भरून काढण्यासाठी वेगवेगळी फळं आणि औषधं खावी लागतात. सोबतच रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला आहारात डाळीचा समावेश करावा लागतो.
Iron Rich Food: शरीरात रक्तच नसेल तर व्यक्ती जिवंतच राहू शकत नाही. जराही रक्त कमी झालं तर अनेक समस्या होऊ लागतात. रक्ताची कमतरता असेल तर एनीमिया नावाचा घातक आजार होतो. एनीमिया एक गंभीर आजार आहे जो शरीरात रक्त कमी झाल्यावर होतो. एनीमियामुळे शरीरात आयरनची कमतरता होते. ते भरून काढण्यासाठी वेगवेगळी फळं आणि औषधं खावी लागतात. सोबतच रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला आहारात डाळीचा समावेश करावा लागतो.
कोणती डाळ खावी?
जर शरीरात आयरनची कमतरता भरून काढण्यासाठी चण्याची डाळ फायदेशीर ठरते. चण्यामध्ये आयरन भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे रक्ताची कमतरता भरून काढण्याच चण्याची डाळ खावी. यासोबतच यात अनेक पोषक तत्व असतात. जे एनीमियासारख्या आजारात फायदेशीर ठरतात.
चण्याच्या डाळीचे फायदे
- चण्याच्या डाळीमध्ये आयरन, कॅल्शिअम, प्रोटीन आणि फायबर भरपूर असतं. चण्याची डाळ नियमित खाल्ल्याने अनेक आजार जवळही येत नाहीत.
- आयरन असलेली चण्याची डाळ खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर केली जाऊ शकते. एनीमियामध्ये चण्याची डाळ खाणं फार फायदेशीर ठरू शकतं.
- चण्याच्या डाळीचं नियमित सेवन केल्याने रक्तात हीमोग्लोबिन वाढू शकतं. याने रक्ताची कमतरता दूर होते.
- चण्याच्या डाळीमध्ये आयरनसोबतच प्रोटीनही भरपूर असतं. ही डाळ खाल्ल्याने मांसपेशी मजबूत होतात. तसेच चण्याची डाळ फुप्फुसं आणि हार्टसाठीही चांगली असते.
- चण्याची डाळ इम्यून सिस्टीमही मजबूत करण्याचं काम करते. ही खाल्ल्याने इम्यूनिटी वाढते आणि अनेक आजारांसोबत लढण्याची शक्ती मिळते.