सकाळी लघवीचा रंग 'असा' दिसेल तर वेळीच व्हा सावध, आतल्या आत डॅमेज होऊ शकतात किडनी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 12:08 IST2025-02-21T12:07:47+5:302025-02-21T12:08:58+5:30
Kidney Damage Symptoms: सकाळी लघवीला गेल्यावरही किडनी डॅमेज होत असल्याचं एक लक्षण दिसतं. त्याबाबत जाणून घेऊया. जेणेकरून तुम्हाला वेळीच उपचार घेता येतील.

सकाळी लघवीचा रंग 'असा' दिसेल तर वेळीच व्हा सावध, आतल्या आत डॅमेज होऊ शकतात किडनी!
Kidney Damage Symptoms: किडनी शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. किडनींच्या माध्यमातून शरीरात जमा झालेले विषारी तत्व आणि वेस्ट बाहेर काढले जातात. ज्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी होतो. मात्र, जेव्हा किडनी योग्यपणे काम करत नाही तेव्हा शरीरात वेगवेगळ्या समस्या होतात. किडनी जर एखाद्या कारणानं खराब झाल्या तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या होतात. अशात यांची लक्षणं दिवसा वेगळी आणि रात्री वेगळी दिसतात. हात-हाय, चेहरा आणि त्वचेवर किडनी डॅमेज झाल्याची लक्षणं दिसतात. सकाळी लघवीला गेल्यावरही किडनी डॅमेज होत असल्याचं एक लक्षण दिसतं. त्याबाबत जाणून घेऊया. जेणेकरून तुम्हाला वेळीच उपचार घेता येतील.
किडनी डॅमेज झाल्याचं सकाळी दिसणारं लक्षण
लघवीमध्ये बदल
किडनी क्षमता कमजोर झाल्यावर लघवीमध्ये गडबड बघायला मिळते. जेव्हा किडनी योग्यपणे काम करत नाहीत, तेव्हा लघवीमध्ये काही बदल दिसतात. सामान्यपणे लघवीचा रंग हलका पिवळा असतो. पण किडनी कमजोर झाली असेल तर लघवीचा रंग गर्द पिवळा होतो. लघवीमधून फेस येतो आणि लघवी थांबून थांबून येते.
तसेच रात्री यूरीन पास करण्यासाठी पुन्हा पुन्हा उठावं लागतं, हाही एक किडनी डॅमेज झाल्याचा संकेत असू शकतो. किडनी जेव्हा शरीरातील वेस्ट आणि टॉक्सिन व्यवस्थित फिल्टर करू शकत नाही तेव्हा लघवी फोर्सनं येत नाही. अशात तुम्हाला लघवीसाठी पुन्हा पुन्हा जावं लागतं.
लघवी करताना जळजळ-वेदना
किडनी डॅमेज झाल्यावर लघवी करताना तुम्हाला वेदना आणि जळजळ अशा समस्या होऊ शकतात. किडनी कमजोर झाल्यावर यूरीनरी ट्रॅक्टमध्ये सूज वाढू शकते आणि इन्फेक्शनही होऊ शकतं. यामुळे यूरीन पास करतेवेळी वेदना आणि जळजळ होते.
रात्री पुन्हा पुन्हा तहान लागणे
जेव्हा किडनी योग्यपणे काम करत नाहीत तेव्हा शरीरातील लिक्वीडचं संतुलन बिघडतं. यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता होते आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा तहान लागते. खासकरून रात्रीच्या वेळी तहान लागल्यावर पुन्हा पुन्हा पाणी पिण्यासाठी उठावं लागतं.
किडनी डॅमेज झाल्याची इतर लक्षणं
- सकाळी पोटात क्रॅम्प्स किंवा आखडलेपणा जाणवणे आणि पोटात वेदना
- लघवीतून रक्त येणे
- त्वचेवर खाज आणि रॅशेज
- सकाळी झोपेतून उठल्यावर अधिक थकवा जाणवणे
- कमजोरी आणि चक्कर येण्यासारख्या समस्या