ऋतू बदलतोय? इन्फेक्शन टाळण्यासाठी काय कराल?

By admin | Published: June 6, 2017 05:38 PM2017-06-06T17:38:13+5:302017-06-06T17:38:13+5:30

सर्दी-खोकला,अंगदुखी या ऋतूबदलताना होणाऱ्या कॉमन आजारांना दूर कसं ठेवाल?

Changing Seasons? What to do to prevent infection? | ऋतू बदलतोय? इन्फेक्शन टाळण्यासाठी काय कराल?

ऋतू बदलतोय? इन्फेक्शन टाळण्यासाठी काय कराल?

Next


- नितांत महाजन

ऋतूबदल होतोय. दरवर्षी या काळात एक मंद, उदास वातावरण असतं. मळभ येतं. आपल्यालाच एकदम उदास वाटतं. आळस येतो. अनेकांना सांधेदुसखीचा त्रास होतो. काहीजणांना एकदम डिप्रेस्ट वाटून रडू येऊ शकतं. ही सगळी वातावरणाची कृपा आहे असं मानलं तरी, अशी काही लक्षणं असतील तर किंवा दरवर्षी हवा बदलली की आपल्याला हमखास सर्दीखोकला होत असेल तर आपल्या आहाराविहारात काही बदल करायला हवेत. पूर्वीच्या काळी रीतीभातीतून ऋतूप्रमाणे आहारबदल होत असे आता आपण त्यासाऱ्याकडे जुनाट म्हणून लक्ष देत नाही आणि आहारात योग्य बदल न केल्यानं ऋतूबदल त्रास देऊ शकतो.
त्यावर उपाय काय?
उपाय म्हणून आपण काही गोष्टी करु शकतो.

१) व्हिटॅमिन डी
आपल्याकडे उदंड सूर्यप्रकाश असूनही अनेक स्त्रीपुरुषांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळते. स्त्रियांमध्ये तर जास्तच. त्यावर उपाय काय? खरंतर रोज सकाळी १० मिनिटं तरी किमान कोवळा सूर्यप्रकाश आपल्याला मिळायला हवा. उन्हात जायला हवं. त्यामुळे सूर्योदयानंतर लगेच काही काळ उन्हात फिरुन या, खुर्ची टाकून बसा. त्यानं डी जीवनसत्व तर मिळेलच. फ्रेश वाटेल. हे जीवनसत्व फारच कमी असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्यानं औषध घ्या.

 



२) प्रो बायोटिक
फार मोठा वाटतो हा शब्द. त्या साठीची औषधंही बाजारात ढिगानं मिळतात. म्हणजे काय तर आपल्या पोटात पचनाला मदत करणाऱ्या हेल्दी बॅक्टेरियांची आतड्यांना मदत होणं. ते आतड्यात असणं. त्यासाठीची औषधं घेण्यापेक्षा आहारात दह्याताकाचा वापर करावा. शक्यतो दही सकाळच्या जेवणात, नाश्त्यात घ्यावं. त्यानं पचनशक्ती चांगली राहते.

३) झिंक
झिंक सप्लीमेण्ट प्रतिकार शक्ती वाढवायला मदत करते. घरचा गुळाचा शिरा, साधा शिरा, पौष्टिक सुकामेवा, मनूका यातून हे मिळू शकतं. पण इन्फेक्शन सतत होत असतील तर डॉक्टरच्या सल्यानं झिंक सप्लीमेण्टची औषधं घेवू शकतात.

४) आयर्न
लोह. रक्तवाढीसाठी आवश्यक. नाचणीचं पिठ, गुळाचा शिरा, बीट, राजगीरा लाडू असं खरंतर या काळात खायला हवं. आणि शक्यतोवर लोखंडी कढईतच भाज्या करायला हव्या. त्यातून लोह पोटात जातं. आपलं हिमोग्लोबिन तपासून घ्यावं. ते फारच कमी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं उत्तम.

५) नाश्ता
हा सगळ्यात सोपा उपाय. या काळात आणि पुढे पावसाळ्यातही भरपेट नाश्ता चुकवायचा नाही. गरमागरम, घरचं, पोळीभाजी, पोहेसांजा, असं खाल्लेलं उत्तम. शक्यतो आंबवलेले पदार्थ टाळावेत. सकाळी पोटभर नाश्ता केला तर त्यानं आपली एनर्जी लेव्हल चांगली राहते, मूडही चांगला राहतो दिवसभर.

Web Title: Changing Seasons? What to do to prevent infection?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.