Health tips: अन्न ३२ वेळा चावलं पाहिजे पण पाणी पिण्याचे नियम काय? जाणून घ्या तज्ज्ञांकडूनच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 06:31 PM2022-03-20T18:31:08+5:302022-03-20T18:38:36+5:30

अन्न किमान ३२ वेळा चावलं पाहिजे. असंच काहीसं पाण्याच्याबाबतीतही सुचवलं जातं, ते म्हणजे पाणी थेट पिऊ नये. थोडा वेळ तोंडात ठेवा आणि (Drink Your Food, Chew Water) हळू हळू गिळा.

chew food 32 times and drink water slowly helps your health | Health tips: अन्न ३२ वेळा चावलं पाहिजे पण पाणी पिण्याचे नियम काय? जाणून घ्या तज्ज्ञांकडूनच

Health tips: अन्न ३२ वेळा चावलं पाहिजे पण पाणी पिण्याचे नियम काय? जाणून घ्या तज्ज्ञांकडूनच

googlenewsNext

अन्न घाई-गडबडीत कधीही खाऊ नये, असे आपल्याला वडीलधारी माणसं लहानपणापासून सांगत आली आहेत. अन्न नीट चावले पाहिजे, ते लगेच गिळू नये आणि न चावता थेट पोटात जाऊ देऊ नये. तुम्ही असंही ऐकलं असेल की अन्न किमान ३२ वेळा चावलं पाहिजे. असंच काहीसं पाण्याच्याबाबतीतही सुचवलं जातं, ते म्हणजे पाणी थेट पिऊ नये. थोडा वेळ तोंडात ठेवा आणि (Drink Your Food, Chew Water) हळू हळू गिळा.

अनेकवेळा तुमच्या मनात प्रश्न येईल की, शेवटी अन्न चावून खाण्यास का सांगितले जाते? यामागचे कारण काय आणि असे केल्याने शरीराला काय फायदा होईल? या प्रश्नांची उत्तरे देताना दैनिक भास्कर वृत्तपत्रानं तज्ज्ञांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे. (Drink Your Food, Chew Water). या अहवालात, क्लिनिकल आणि सार्वजनिक आरोग्य पोषण संशोधक डॉ. सुभाषश्री रे (Dr. Subhasree Ray) लिहितात की, अन्नाचं पचन तोंडापासून सुरू होतं. अन्न चघळल्यानं तोंडात तयार होणारी लाळ अन्नाला मऊ करते आणि शरीराला आवश्यक हार्मोन्स सोडण्यास पुरेसा वेळ मिळतो. अन्न पचवण्यासाठी, ते शक्य तितकं आतड्याच्या संपर्कात येणं आवश्यक आहे. पाणी पितानाही गटागट एकमद पोटात घेणं चुकीचं आहे. पाणी पिताना शांतपणे घोट-घोट घ्यायला हवे. अशा पद्धतीनं प्यायलेल्या पाण्याचा शरीराला अधिक फायदा होतो.

अन्न जितकं जास्त चघळलं जाईल, तितकं ते आतड्यांच्या संपर्कात येईल, बारीक होईल, असे डॉ. सुभाषश्री सांगतात. त्यामुळं अन्न पचवणारे एन्झाइम्स त्यात पुरेशा प्रमाणात मिसळू शकतील. याशिवाय चघळल्याशिवाय किंवा कमी चघळल्याशिवाय जास्त खाण्याची शक्यता खूप वाढते. असंही घडतं की खूप लवकर-लवकर खाल्ल्यानंतर मेंदूला उशीरानं पोट भरण्याचे संकेत मिळतात. त्यामुळं अन्न भुकेपेक्षा जास्त खाल्लं जाऊन आपल्या शरीरात जाणाऱ्या कॅलरीजचं प्रमाण वाढतं. याचा परिणाम म्हणजे लठ्ठपणा वाढतो. तर, अन्न चघळण्याचे आणि खाण्याचे काय फायदे आहेत, ते जाणून घेऊ.

लठ्ठपणा आणि वजन कमी होणे
भूक आणि शरीरातील कॅलरीजचं प्रमाण प्रामुख्यानं हार्मोन्सद्वारे नियंत्रित केलं जातं. जेवणानंतर आतड्यात घ्रेलिन (Ghrelin) नावाचं हार्मोन कमी होतं. हे हार्मोन भूक नियंत्रित करतं. यासोबतच जेवणानंतर आतडं अशी हार्मोन्स सोडतात, ज्यामुळे पोट भरल्याची भावना येते. या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे २० मिनिटं लागतात. एवढंच नाही तर अन्न चघळल्यानं तुमचा खाण्याचा वेग कमी होतो, ज्यामुळं शरीरातील कॅलरीजचं प्रमाण कमी होतं. याचा परिणाम म्हणजे स्थूलपणा कमी होतो. कारण, शरीराला आवश्यक तेवढ्याच कॅलरीज मिळतात.

भूक कमी असेल तर पोषण कसं मिळणार?
'द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन'च्या (The American Journal of Clinical Nutrition) संशोधनानुसार, जेव्हा अन्न पुरेसं चघळलं जातं, तेव्हा ते अगदी लहान तुकड्यांमध्ये बदलते. जे गिळल्यावर घशावर पडणारा ताण कमी होतो. तसंच, जेव्हा हे कण आतड्यांपर्यंत पोहोचतात, तेव्हा एन्झाईम्स त्यांत सहजपणे विरघळतात. ज्यामुळं पोषण अधिक प्रमाणात तयार होतं आणि शरीरात वेगानं शोषलं जातं. यामुळं कमी अन्न खाऊनही शरीराला अधिक पोषण आणि प्रथिनं मिळतात.

अन्न-पाणी घाईत खाण्याचे तोटे
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तुम्ही अन्न योग्य प्रमाणात चघळत नाही आणि पाणी वेगात पिता तेव्हा पचनसंस्थेमध्ये गोंधळ होतो. शरीरात एन्झाईम्स पुरेशा प्रमाणात तयार होत नाहीत. त्यामुळं पोट फुगणं, जुलाब, छातीत जळजळ आणि जास्त प्रमाणात ऍसिड तयार होणं, पोटदुखी, नाकातून पाणी येणं, डोकेदुखी, चिडचिड, कुपोषण, अपचन आणि गॅस यांसारख्या समस्या उद्भवतात.

Web Title: chew food 32 times and drink water slowly helps your health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.