सकाळी रिकाम्या पोटी चावून खा हे एक पान, कोलेस्ट्रॉल कंट्रोल होऊन हार्ट अटॅकचा धोकाही टळेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 11:49 AM2024-11-18T11:49:14+5:302024-11-18T11:50:36+5:30
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय सांगितले जातात. त्यातील एक सोपा आणि फायदेशीर उपाय म्हणजे खायचं पान.
Betel leaf for high cholesterol: आजकाल चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या होत आहे. ही समस्या वेळीच कंट्रोल केली नाही तर हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका असतो. अशात कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय सांगितले जातात. त्यातील एक सोपा आणि फायदेशीर उपाय म्हणजे खायचं पान.
बऱ्याच लोकांना पान खाण्याची सवय असते. तर काही लोक जेवण झाल्यावर पान खातात. या पानाने टेस्ट तर मिळतेच, सोबतच याचे अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. रोज सकाळी तर खायचं पान चावून खाल्लं तर कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते.
या पानासोबतच तुम्ही एक हेल्दी आहार घेतला आणि हेल्दी लाइफस्टाईल फॉलो केली तर तुम्हाला कोलेस्ट्रॉल कंट्रोल ठेवण्यास मदत मिळू शकते. अशात या पानामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल कशी कंट्रोल राहते हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अॅटी-ऑक्सिडेंट्स
खायच्या पानात अनेक अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करण्याचं काम करतात. तसेच याने शरीरात बॅज कोलेस्ट्रॉल कमी होऊन गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यासही मदत मिळते. तसेच पानात काही असेही गुण असतात ज्यामुळे लिव्हरचं कामही सुधारतं. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतं.
हृदय निरोगी राहतं
खायच्या पानामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि इतरही अनेक पोषक तत्व असतात. जे ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यास मदत करतात आणि हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवतात. या पानाच्या सेवनाने रक्ताच्या गाठी होण्याचा धोकाही टाळता येतो. ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका आपोआप टाळला जातो.
कोलेस्ट्रॉलचं अवशोषण कमी करतं
खायच्या पानामध्ये काही खास तत्व असतात जे शरीरात कोलेस्ट्रॉलचं अवशोषण कमी करण्यास मदत करतं. याने शरीरात फॅटचं प्रमाणही नियंत्रित होतं आणि रक्तात वाढलेलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी होतं.
काय काळजी घ्याल?
- जास्त प्रभावासाठी नेहमी साधं पान खावं. त्यात मसाले किंवा तंबाखू टाकू नये. जर तुम्ही एखाद्या आजाराचं औषध घेत असाल तर पान खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.