अन्न घाईघाईने खाल्ल्याने वजन वाढतं का? जाणून घ्या काय म्हणाले एक्सपर्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 12:41 PM2024-11-07T12:41:10+5:302024-11-07T12:42:23+5:30

Weight Gain Cause : फिटनेस एक्सपर्ट प्रशांत देसाई यांच्याकडून जाणून घेऊ अन्न घाईघाईने खाल्ल्याने वजन वाढू शकतं का?

Chewing food fast could lead to weight gain says expert | अन्न घाईघाईने खाल्ल्याने वजन वाढतं का? जाणून घ्या काय म्हणाले एक्सपर्ट!

अन्न घाईघाईने खाल्ल्याने वजन वाढतं का? जाणून घ्या काय म्हणाले एक्सपर्ट!

Does Chewing Food Fast Cause Weight Gain: घरातील मोठे लोक आपल्याला बालपणीच शिकवतात की, अन्न चांगलं बारीक चावून चावून खाल्लं पाहिजे. तर आयुर्वेदानुसार, एक घास ३२ वेळा चावून खाल्ला पाहिजे. अन्न व्यवस्थित चावून खाल्लं तर पचन चांगलं होतं. तसेच त्यातील पोषक तत्वही शरीरात अवशोषित होतात. पण बरेच लोक घाईघाईत जेवण करतात. ते अन्न व्यवस्थित चावून खात नाहीत. जे शरीरासाठी खूप नुकसानकारक ठरतं. इतकंच नाही तर अन्न व्यवस्थित चावून खाल्लं गेलं नाही तर वजनही वाढू शकतं. फिटनेस एक्सपर्ट प्रशांत देसाई यांच्याकडून जाणून घेऊ अन्न घाईघाईने खाल्ल्याने वजन वाढू शकतं का?

घाईघाईने जेवण केल्यास वजन वाढतं?

एक्सपर्टनुसार, अन्न नेहमी व्यवस्थित चावून खाल्लं पाहिजे. ही एक चांगली सवय आहे. पण अन्न घाईघाईने खाणं एक चुकीची सवय आहे. अन्न नेहमी शांतपणे चावून खावं. घाईघाईने खाल्ल्यास मेटाबॉलिक डिसऑर्डर होण्याचा धोका खूप जास्त वाढतो. याने तुमचं मेटाबॉलिज्म स्लो होतं, अशात शरीरात फॅट जमा होऊ लागतं. ही सवय वेळीच सोडली नाही तर तुम्ही लवकर लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता. एक्सपर्टनुसार, अन्न व्यवस्थित हळुवार चावून खाणाऱ्यांच्या तुलनेत घाईघाईने खाणाऱ्यांना मेटाबॉलिज्म डिसऑर्डरचा धोका ४०० टक्के अधिक जास्त असतो.

घाईघाईने जेवण केल्यास कसं वाढतं वजन?

जेव्हा तुम्ही अन्न हळूहळू चावून खाता तेव्हा पोट मेंदुला संकेत देतो की, तुमचं पोट भरलेलं आहे. मात्र, घाईघाईने जेवण करत असाल तर तुम्ही ओव्हरईटिंग करता, ज्यामुळे तुमचं वजन वाढतं.

हळूहळू खाण्याची सवय कशी लावाल?

अन्न हळूहळू चावण्याची सवय लावण्यासाठी जेवण करताना टीव्ही किंवा मोबाईल बघणं टाळावं. तसेच जेवण करण्यासाठी जास्त वेळ द्या. घाईघाईने जेवण करू नका. जेवण करताना तुमचं लक्ष केवळ जेवणावर असलं पाहिजे. 

Web Title: Chewing food fast could lead to weight gain says expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.