तोंडातील फोड बरा करण्यासाठी पेरूच्या पानांचा 'असा' करा वापर, ठरेल बेस्ट आयुर्वेदिक उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 10:22 AM2024-06-11T10:22:26+5:302024-06-11T10:23:21+5:30

Guava leafs benefits : पेरू तर तुम्ही नेहमीच खात असाल, पण पेरूच्या पानांचे आरोग्याला होणारे फायदे अनेकांना माहीत नसतात. तेच आज आम्ही सांगणार आहोत.

Chewing guava leaves will help you to reduce mouth ulcer know other benefits | तोंडातील फोड बरा करण्यासाठी पेरूच्या पानांचा 'असा' करा वापर, ठरेल बेस्ट आयुर्वेदिक उपाय

तोंडातील फोड बरा करण्यासाठी पेरूच्या पानांचा 'असा' करा वापर, ठरेल बेस्ट आयुर्वेदिक उपाय

Guava leafs benefits : उष्णतेमुळे अनेकांना तोंडात किंवा जिभेवर फोड येण्याची समस्या होत असते. याला तोंड येणं असं म्हणतात. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, जास्त जागरण, पाणी कमी पिणे यामुळे ही समस्या अनेकांना होत असते. अशात ही समस्या झाल्यावर काही खाणं किंवा पिणंही वेदनादायी ठरतं. त्यामुळे यावर एक आयुर्वेदिक उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

हा उपाय करून तुमची ही समस्या लगेच दूर होण्यास मदत मिळेल. हा उपाय म्हणजे पेरूची पाने. पेरू तर तुम्ही नेहमीच खात असाल, पण पेरूच्या पानांचे आरोग्याला होणारे फायदे अनेकांना माहीत नसतात. तेच आज आम्ही सांगणार आहोत.

arogyadai_aurved नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर याबाबत एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यात सांगितलं की, जर तुमचं तोंड आलं असेल तर पेरूचे १ पान चावून, त्याचा तयार होणार चोथा २-३ मिनिटे तोंडात फिरवून नंतर थुंकून टाकावा.

पेरूच्या पानांचे इतर फायदे

- पेरूच्या पानांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आणि फायबर भरपूर असतात. या तत्वांमुळे तुमचं हृदय, पचन आणि शरीरक्रिया योग्य राहतात. 

- पेरूच्या पानांचा चहा सेवन केल्यावर जेवल्यावर वाढलेली ब्लड शुगर लेव्हल कमी होते. अशात डायबिटीसच्या रूग्णांनी या पानांचं किंवा याच्या चहाचं सेवन केलं पाहिजे.

- पेरूच्या पानांमधील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन हृदयाचा फ्री रॅडिकलपासून बचाव करतात. त्याशिवाय या पानांचा अर्क लो ब्लड प्रेशर, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवतो.

-  पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी असतं. याने इम्यून सिस्टीम मजबूत होण्यास मदत मिळते. ज्यामुळे तुमचा वेगवेगळ्या आजारांपासून आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो. 

Web Title: Chewing guava leaves will help you to reduce mouth ulcer know other benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.