च्युइंगम चघळल्याने कमी होतं वजन, जाणून घ्या कसं...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 10:08 AM2019-10-22T10:08:55+5:302019-10-22T10:09:00+5:30
प्रत्येकजण कधीना कधी च्युइंगम खातोच. त्यासोबतच आपल्याला नेहमी सांगितलं जातं की, च्युइंगम खाताना सावधगिरी बाळगावी. कारण च्युइंगम गिळलं तर नुकसानकारक ठरू शकतं.
प्रत्येकजण कधीना कधी च्युइंगम खातोच. त्यासोबतच आपल्याला नेहमी सांगितलं जातं की, च्युइंगम खाताना सावधगिरी बाळगावी. कारण च्युइंगम गिळलं तर नुकसानकारक ठरू शकतं. तसेच जर तुम्हाला कुणी सांगत असेल की, च्युइंगम चघळल्याने वजन कमी होतं, तर या आश्चर्याची काहीच बाब नाही. अनेक रिसर्चमधून समोर आले आहे की, च्युइंगम चघळल्याने कार्विंग कंट्रोल करण्यास मदत मिळते. त्यासोबतच च्युइंगम ओव्हरइटिंगही रोखतं आणि भूक मॅनेज केली जाते. त्यामुळे शरीरातील एक्स्ट्रा वजन कमी होतं.
अनेक रिसर्चमधून समोर आले आहे की, च्युइंगम चघळल्याने कॅलरी बर्न करण्यास मदत मिळते. एका रिसर्चमध्ये आढळलं की, जे लोक च्युइंगम चघळतात, त्यांनी कमीत कमी कॅलरी कंज्यूम केल्या जातात. त्याव्यतिरिक्त च्युइंगम चघळणाऱ्यांमध्ये इतर लोकांच्या तुलनेत ५ टक्के कॅलरी बर्न होतात. ते एका दुसऱ्या रिसर्चमधून असं समोर आलं की, च्युइंगम चघळल्याने भूक कंट्रोल करण्यास मदत मिळते. याचप्रकारे रिसर्चमध्ये सहभागी लोकांमधील कॅलरीचं प्रमाण रोज कमी झालं.
कधी खावं च्युइंगम
- जेव्हा तुम्ही फ्री असाल तेव्हा
- जेवण केल्यानंतर
- बाहेरचं काही खाण्याची इच्छा होत असेल तेव्हा
- जेवण तयार करताना च्युइंगम खाऊ शकता
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की, च्युइंगम चघळून तुमचं वजन कमी करण्यास तेव्हाच मदत होऊ शकते, जेव्हा तुम्ही नियमितपणे एक्सरसाइज कराल आणि चांगला आहार घ्याल. त्यासोबतच याचीही काळजी घ्या की, फार जास्त च्युइंगम चघळू नका. तसेच शुगर फ्री च्युइंगम खावे, कारण यात सामान्य च्युइंगमच्या तुलनेत कमी कॅलरी असतात.
(टिप : च्युइंगममुळे वजन कमी होतं याचा आम्ही दावा करत नाही. वरील लेखातील मुद्दे हे केवळ माहिती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. याचा वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)