15 दिवसांतच 3-4 किलो वजन घटवतं 'हे' ड्रिंक; जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 04:53 PM2019-05-30T16:53:52+5:302019-05-30T16:56:30+5:30

वजन कंट्रोल करण्यासाठी लोक फक्त जिममध्येच जात नाहीत, तर अनेक घरगुती उपायही ट्राय करतात. कारण यामुळे शरीराला काही नुकसान होत नाही आणि हे परिणामकारकही ठरतात.

Chia seeds or sabja drink best for weight loss | 15 दिवसांतच 3-4 किलो वजन घटवतं 'हे' ड्रिंक; जाणून घ्या फायदे

15 दिवसांतच 3-4 किलो वजन घटवतं 'हे' ड्रिंक; जाणून घ्या फायदे

googlenewsNext

वजन कंट्रोल करण्यासाठी लोक फक्त जिममध्येच जात नाहीत, तर अनेक घरगुती उपायही ट्राय करतात. कारण यामुळे शरीराला काही नुकसान होत नाही आणि हे परिणामकारकही ठरतात. त्याशिवाय यांचे काहीच साइड इफेक्ट नसतात. पण वजन कमी करण्यासाठी सब्जा अत्यंत फायदेशीर ठरतो. 

खरं तर सब्जा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. यामध्ये फक्त प्रोटीनच नाही तर फायबर, ओमेगा-3 फॅट्स मुबलक प्रमाणात असतात. जे मेटाबॉलिज्मला बूस्ट करण्यासाठी, भूक शांत करण्यासाठी आणि फॅट्स बर्न करणारे मोठे हार्मोन्स म्हणजेच, ग्लूकागोन (Glucagon) वाढविण्यासाठी मदत करतात. त्यामुळेच हे वजन कमी करण्यासाठी सुपर फूड्स समजले जातात. 

2015मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, दररोज 30 ग्रॅम फायबरचे सेवन केलं तर तुमचं वजन वेगाने कमी होतं आणि 2 चमचे सब्जामध्ये 10 ग्रॅम फायबर असतं. आज आपण जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी सब्जाचं सेवन कसं करावं त्याबाबत...

वेट लॉस ड्रिंक तयार करण्याची पद्धत...

साहित्य : 

  • एक कप पाणी 
  • एक चमचा सब्जा
  • दोन चमचे लिंबाचा रस 
  • दोन चमचे मध 

 

वापर करण्याची पद्धत : 

सर्वात आधी एक कप पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा सब्जा रात्रभर भिजत ठेवा. सकाळी यामध्ये मध आणि लिंबाचा रस एकत्र करून रिकाम्यापोटी याचं सेवन करा. तुम्हाला गरज असेल तर मध-लिंबाचा रस न वापरता याचं सेवन करू शकता. फक्त तुम्हाला याच्या अर्ध्या तासानंतर कोणत्याही पदार्थाचं सेवन करू नका. यामुळे फक्त वजनच कमी होत नाही तर इतरही अनेक फायदे होतात. 

15 दिवसांमध्ये कमी होतं वजन 

लक्षात ठेवा की, हे ड्रिंक सलग प्यायल्यावे 15 दिवसांमध्ये 2 ते 4 किलो वजन कमी करणं सहज शक्य होतं. परंतु जेव्हा तुम्ही यासोबत थोडासा व्यायाम आणि डाएटमध्ये गोड पदार्थ किंवा तळलेले पदार्थ खाणं बंद करणं आवश्यक असतं. 

सब्जाचे इतर फायदे : 

सूज दूर करतं 

सब्जाच्या नियमित सेवनाने इनफ्लामेशन म्हणजेच सूजेवर नियंत्रण राहतं. ही सूज शरीराच्या अनेक समस्यांचं कारण ठरू शकते. 

कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण 

सब्जामध्ये ओमेगा-3 मोठ्या प्रमाणावर असतं, ज्यामुळे हृदय किंवा कोलेस्ट्रॉल संबंधी समस्या दूर होतात. 

कॅन्सरपासून बचाव 

सब्जाच्या बियांमध्ये अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. जे शरीरामधून फ्री रॅडीकल्स बाहेर टाकण्यासाठी मदत करतात आणि फ्री रॅडिकल्सचा थेट संबंध हृदय रोग किंवा कॅन्सरशी होऊ शकतो. 

तापमान कंट्रोल करण्यासाठी 

सब्जा शरीराचं तापमान कंट्रोलमध्ये ठेवतो. यामध्ये अस्तित्वात असलेलं लोह, ओमेगा-3 फॅटी अॅसिड, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम आपली ताकद वाढविण्यासाठी मदत करतं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं. 

Web Title: Chia seeds or sabja drink best for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.