चिया सीड्स आणि लिंबाच्या रसाचं एकत्र करा सेवन, पावसाळ्यात मिळेल अनेक फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 09:40 AM2024-07-04T09:40:09+5:302024-07-04T09:41:12+5:30
Chia Seeds with Lemon : हे ड्रिंक पूर्णपणे नॅचरल आहे त्यामुळे याचे काही साइड इफेक्ट्सही होणार नाहीत. महत्वाची बाब म्हणजे लिंबाच्या रसासोबत मिक्स झाल्यावर याचे फायदेही वाढतात.
Chia Seeds with Lemon : लोक आजकाल आपल्या आरोग्याची खूप काळजी घेत आहेत. लाइफस्टाईलमध्ये बदल, आहारात बदल आणि काही खास ड्रिंक्सचं सेवन करून शरीर निरोगी आणि फीट ठेवत आहेत. आज आम्हीही तुम्हाला एका खास ड्रिंकबाबत सांगणार आहोत. लिंबू पाण्यात चिया सीड्स मिक्स करून प्यायल्यास काय फायदे मिळतात हे जाणून घेणार आहोत.
डिहायड्रेशनपासून बचाव
हे ड्रिंक तुम्ही रिकाम्या पोटी प्याल तर तुम्हाला याचा जास्त फायदा मिळू शकतो. याच्या सेवनाने शरीरात पाणी कधीच कमी होणार नाही. म्हणजे याने डिहायड्रेशनपासून तुमचा बचाव होऊ शकतो. हे ड्रिंक पूर्णपणे नॅचरल आहे त्यामुळे याचे काही साइड इफेक्ट्सही होणार नाहीत. महत्वाची बाब म्हणजे लिंबाच्या रसासोबत मिक्स झाल्यावर याचे फायदेही वाढतात.
भरपूर पोषक तत्व
या खास ड्रिंकमधून तुम्हाला अनेक पोषक तत्व मिळतात जसे की, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सोडिअम, पोटॅशिअम आणि इतरही पोषक तत्व. या ड्रिंकला झिरो कॅलरी ड्रिंक मानलं जातं. जर तुम्ही सकाळी कोमट पाणी पित असाल तर यात थोडा लिंबाचा रस आणि चिया सीड्स टाकून सेवन करू शकता. तुम्ही साध्या पाण्यातही याचं सेवन करू शकता.
काय आहेत चिया सीड्स
चिया सीड्स छोटे, काळ्या-पांढऱ्या रंगाचे दाणे असतात. या बियांमध्ये क्वेरसेटिन नावाचं अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. तसेच यात भरपूर प्रमाणात फायबर असतात. याच्या सेवनाने हाय बीपीचा धोका कमी होतो. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतं.
पावसाळ्यात हे ड्रिंक पिण्याचे फायदे
- पाण्यासोबतच चिया सीड्सचं सेवन केल्याने शरीरात पाणी होत नाही. यात कॅलरीही नसतात. हे लिंबूसोबत एक फ्रेश ड्रिंक आहे. हे ड्रिंक तुम्ही एका एअरटाईट बॉटलमध्ये ठेवून १ ते २ तास सेवन करू शकता.
- चिया सीड्स ड्रिंक प्यायल्याने पचनक्रियाही चांगली होते. यात भरपूर फायबर असतं. जे बद्धकोष्ठतेची आणि पचनासंबंधी समस्या दूर करतात.
- चिया सीड्सचं ड्रिंक हृदयासाठीही खूप चांगलं असतं. या ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतं. जे हृदयासाठी खूप चांगलं असतं. तसेच शरीरात जमा बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत मिळते.
- या खास ड्रिंकने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासही मदत मिळते. म्हणजे हे तुम्ही बॉडी डिटॉक्ससाठी सेवन करू शकता.