महाशिबिराचा पॅटर्न मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा : महाआरोग्य शिबिराचे सहा मंंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन
By admin | Published: January 9, 2016 11:23 PM2016-01-09T23:23:27+5:302016-01-09T23:23:27+5:30
मुख्य
Next
म ख्य जळगाव- दुष्काळ व इतर समस्यांमुळे शेतकरी, गोरगरीब कुटंुंब, मजूर अडचणीत आहेत. अशात कुठला आजार आला तर मोठी समस्या असते. मराठवाड्यातही आरोग्य सेवांची गरज आहे. या स्थितीत शेतकर्यांना मदत, आधार म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सहकार्यांतर्फे जळगावात आयोजित विनामूल्य महाआरोग्य शिबिरासारखा कार्यक्रम मराठवाड्यातही राबविला जाईल. त्यासाठी आम्ही मदत करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शहरात आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी दिले. खान्देश सेंट्रल मॉलच्या आवारात मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसह जलसंपदामंत्री गिरीश महाजन, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्य अल्पसंख्याक विकास आयोगाचे अध्यक्ष मोहंमद हुसेन खान, जे.जे.रुग्णालय, मुंबईचे अधिष्ठाता डॉ.तात्याराव लहाने, खान्देशातील ठिकठिकाणचे आमदार, राज्यभरातील नामांकीत डॉक्टर आदी उपस्थित होते. जलसंपदामंत्र्यांना मानाचा मुजरामुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जळगावात गोरगरीब, शेतकरी आदींच्या आरोग्य सेवेसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे २० वर्षे काम करीत आहे. ते आरोग्यदूत आहे. त्यांच्या कामाचे वर्णन करायला शब्द नाहीत. जे काम महाजन यांनी केले त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यांना आमचा मानाचा मुजरा...., असे तोंडभरून कौतुक मुख्यमंत्र्यांनी जलसंपदामंत्री महाजन यांचे केले.आमच्याकडे पॅरलल आरोग्यखातेआरोग्यमंत्रीपद शिवसेनेकडे असले तरी गिरीश महाजन यांच्या रुपाने आमच्याकडे पॅरलल आरोग्य मंत्रालय आहे. जे डॉक्टर सहा महिने रुग्णांना भेटत नाही... सतत व्यस्त असतात ते या महाआरोग्यशिबिरासाठी आले. गिरीश महाजन व त्यांचा सहकारी रामेश्वर यांच्या पुण्याईमुळे हे शक्य झाले. रामेश्वर हा महाजन यांचा उजवा हात आहे. आमच्या नागपुरातील रुग्ण आले तर मी त्यांच्यासाठी सेवेबाबत रामेश्वर यांना सांगत असतो, असे कौतुक मुख्यमंत्र्यांनी रामेश्वर नाईक यांच्याबाबत केले. तसेच सामान्यांनी जे अधिकार दिले आहेत त्याचा पुरेपूर वापर महाजन हे सामान्यांसाठी करीत आहेत, असेही मुख्यमंत्री शेवटी म्हणाले.